लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशीप चांगलं आहे का? तेजश्री प्रधान म्हणाली-"हा एक बिझनेस असून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 17:42 IST2024-12-20T17:40:21+5:302024-12-20T17:42:12+5:30
तेजश्री प्रधानने भारतीय विवाहसंस्था आणि लिव्ह इन रिलेशनशीप यावर तिचं परखड मत व्यक्त केलंय

लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशीप चांगलं आहे का? तेजश्री प्रधान म्हणाली-"हा एक बिझनेस असून..."
पूर्वापार चालत आलेल्या विवाहसंस्थेकडे तेजश्री कशी बघतेय. सध्या लग्नापेक्षा लिव्ह इन बरं हा ट्रेंड सुरु आहे. त्यावर तेजश्रीचं मत काय? असा प्रश्न अभिनेत्री तेजश्री प्रधानला लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. तेजश्री म्हणाली की, "तेजश्रीला लग्नापेक्षा लिव्ह इन बरं हे कधीच वाटलं नव्हतं. तसं वाटलं असतं तर तेजश्रीचं आयुष्यही आज वेगळं असतं. त्यामुळे तेजश्री आजही त्याच मताची आहे की लग्न हे झालंच पाहिजे. ती आयुष्यातली फार गोड गोष्ट आहे . अर्थात जगात कोणत्याच गोष्टीची शाश्वती नसते. तरीही लग्न ही मनाला दिलासा अन् उभारी देणारी गोष्ट आहे. दोन फॅमिली एकत्र येतात. तुम्ही सर्वांच्या साक्षीने कोणालातरी आपलंसं करुन घेता."
तेजश्री प्रधान पुढे म्हणाली, "जिथपर्यंत तू विवाहसंस्था किंवा या साईट्सबद्दल बोलशील तर दुर्दैवाने हा एक वेगळा बिझनेस सुरु झालाय. ज्यामध्ये दररोज अनेक नावंं नोंदवली जातात. या नावांमध्ये शहानिशा करायची भासत नाहीये किंवा वेळ उरत नाहीये. त्यामुळे तू टाकलेली माहिती किती खरी आहे. किंबहुना ही माहिती टाकताना त्या व्यक्तीला खरंच ते म्हणायचंय का, इथपासून सुरुवात आहे. की फक्त फॅड आहे म्हणून..."
तेजश्री प्रधान शेवटी म्हणाली, "मॅट्रिमोनीअल साईट्स डेटिंग ्अॅप्स सारख्या वापरल्या जातात. तुम्ही जर अशा साईट्सवर नावं नोंदवली आहेत तर तुम्हाला बाहेर एकट्याने कॉफी शॉप्समध्ये का भेटायचंय. होऊदे की पहिली भेट आई-वडिलांसोबत. कॉफी शॉपमध्ये ८० % लोकांची कंडीशन अशी असते की, एवढ्यात नको घरी सांगूया. अजून ४-५ भेटी होऊदे. ट्रायल अँड एररवर सुरु आहे. आपण जसे पुढारलोय तसं आपले आई-बाबाही पुढारत आहेत की.. तर त्या बंधनासंंकट आपण पुढे गेलो तर नात्याच्या सुरुवातीलाच ती जबाबदारी वाटू शकेल असं मला वाटतं." तेजश्री प्रधान-सुबोध भावेचा हॅशटॅग तदैव लग्नम हा सिनेमा आजपासून सगळीकडे रिलीज झालाय.