"नवऱ्यासोबत काय कधी एकटीही नाही जाणार" चाहतीच्या 'त्या' प्रश्नावर सोनाली कुलकर्णीचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 04:55 PM2023-12-12T16:55:47+5:302023-12-12T16:56:32+5:30

सोनालीने इन्स्टाग्रामवर भारतीय पारंपरिक लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

marathi actress Sonali Kulkarni answers to fans comment saying dont go to bigg boss ever | "नवऱ्यासोबत काय कधी एकटीही नाही जाणार" चाहतीच्या 'त्या' प्रश्नावर सोनाली कुलकर्णीचं उत्तर

"नवऱ्यासोबत काय कधी एकटीही नाही जाणार" चाहतीच्या 'त्या' प्रश्नावर सोनाली कुलकर्णीचं उत्तर

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सध्या दुबईत सासरी राहत आहे. तिने गणपतीच्या मुहुर्तावरच आपलं स्वत:चं युट्यूब चॅनल सुरु केलं. शिवाय दिवाळीत ती दुबईतील नव्या घरी शिफ्ट झाली. काही दिवसांपासून ती दुबईतच असून तेथील फोटो चाहत्यांसोबत पोस्ट करत असते. नुकतंच तिने जांभळ्या साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. यावर एका चाहत्याने केलेली कमेंट आणि त्याला सोनालीने दिलेला रिप्लाय चर्चेत आहे. 

सोनालीने इन्स्टाग्रामवर भारतीय पारंपरिक लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. लॉनवर हे फोटोशूट करण्यात आलंय. यामध्ये तिने जांभळ्या रंगाची सिल्कची साडी नेसली आहे. गळ्यात मंगळसूत्र, मोकळे केस, छोटी टिकली असा तिचा सुंदर लूक पाहायला मिळतोय. 'बीइंग व्हेरी मच इण्डियन in Dubai' असं कॅप्शन तिने दिलं आहे. 

सोनालीच्या या फोटोवर एका चाहतीने कमेंट करत लिहिले,'काही पण कर पण नवऱ्यासोबत बिग बॉसमध्ये नको जाऊ'. यावर सोनालीने उत्तर देत लिहिले,'एकटी पण जाणार नाही कधी'.

सोनालीच्या या उत्तरावर नेटकऱ्यांनाही हसू आलं. सोनाली लवकरच दाक्षिणात्य सिनेमात डेब्यू करत आहे. पहिल्याच साऊथ सिनेमात ती सुपरस्टार मोहनलाल सोबत दिसणार आहे. 'वालिबन' असं सिनेमाचं नाव असून काही दिवसांपूर्वीच टीझर रिलीज झाला आहे.

Web Title: marathi actress Sonali Kulkarni answers to fans comment saying dont go to bigg boss ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.