१० वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते सोनाली-सिद्धार्थ, अभिनेत्रीने सांगितलं काय घडलेलं, म्हणाली-"श्रीदेवींचं निधन झालं तेव्हा…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:25 IST2026-03-26T14:23:58+5:302026-03-26T14:25:34+5:30

सोनाली कुलकर्णी अन् सिद्धार्थ जाधवमध्ये होता १० वर्ष अबोला, अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली-"त्याने अनेक वर्षानंतर मला…"

marathi actress sonalee kulkarni and siddharth jadhav did not speak to each other for 10 years know the reason | १० वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते सोनाली-सिद्धार्थ, अभिनेत्रीने सांगितलं काय घडलेलं, म्हणाली-"श्रीदेवींचं निधन झालं तेव्हा…"

१० वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते सोनाली-सिद्धार्थ, अभिनेत्रीने सांगितलं काय घडलेलं, म्हणाली-"श्रीदेवींचं निधन झालं तेव्हा…"

Sonalee Kulkarni: मराठी मनोरंजन सृष्टीतील 'अप्सरा' म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं.'बकुळा नामदेव घोटाळे', 'गाढवाचं लग्न', 'क्षणभर विश्रांती', 'अजिंठा', 'मितवा',' नटरंग', पोश्टर गर्ल', 'हिरकणी' या सिनेमांतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने सिनेरसिकांना आपलंसं केलं. सध्या सोनाली एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि तिच्यामध्ये १० वर्ष अबोला होता, असा खुलासा केलाय. या मुलाखतीमध्ये सोनाली काय म्हणाली? जाणून घेऊया...

नुकतीच सोनाली कुलकर्णीने व्हायफळ या पॉडकास्टला मुलाखत दिली. त्यावेळी तिने सांगितलं,"मी श्रीदेवी यांची मोठी चाहती आहे. जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा माझा एक अत्यंत जवळचा मित्र आणि मी पुन्हा बोलायला लागलो.म्हणजे ही गोष्ट आता खूप लोकांना माहीत आहे. कारण, आम्ही बऱ्याच प्लॅटफॉर्म आणि इव्हेंट्समध्ये बोललो आहोत. सिद्धार्थ जाधव हा माझा पहिला सहकलाकार, मित्र आहे. त्याने  एका शूटिंगदरम्यान फालतू कारणामुळे माझ्याशी बोलणं सोडलं होतं. ते त्याने दहा वर्ष जपलं. तो अबोला त्याने दहा वर्ष टिकवला. "

मग पुढे सोनाली कुलकर्णी म्हणाली,"त्यावेळी श्रीदेवींचे अचानक निधन झाले. त्यानंतर त्याला साक्षात्कार झाला की असं कदाचित आमच्या बाबतीत घडलं तर आम्हाला एकमेकांशी बोलण्याची संधीच मिळणार नाही. मग त्याने अनेक वर्षांनी मला फोन केला आणि म्हणाला, जाऊदे. आपण सगळं विसरूया. त्यानंतर मग आमची मैत्री आणखी घट्ट झाली.आयुष्य हे खूप लहान आहे.याची जाणीव होण्यासाठी आपण कोणतरी जायची वाट बघू नये." असं सोनालीने यावेळी सांगितलं. 

Web Title : सोनाली कुलकर्णी ने सिद्धार्थ जाधव संग दस साल की चुप्पी तोड़ी, श्रीदेवी की मौत के बाद सुलह।

Web Summary : सोनाली कुलकर्णी ने एक मामूली विवाद के बाद सिद्धार्थ जाधव से दस साल की दूरी का खुलासा किया। श्रीदेवी के आकस्मिक निधन ने जाधव को सुलह करने के लिए प्रेरित किया, जीवन की संक्षिप्तता और संचार के महत्व का एहसास हुआ। इस सुलह के बाद उनकी दोस्ती और मजबूत हुई।

Web Title : Sonalee Kulkarni reveals ten-year silence with Siddharth Jadhav, reconciled after Sridevi's death.

Web Summary : Sonalee Kulkarni disclosed a decade-long estrangement from Siddharth Jadhav following a trivial dispute. Sridevi's sudden demise prompted Jadhav to reconcile, realizing life's brevity and the importance of communication. Their friendship strengthened after this reconciliation.