मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर

By तेजल गावडे. | Updated: April 29, 2025 12:40 IST2025-04-29T12:39:53+5:302025-04-29T12:40:31+5:30

लग्नानंतर ही मराठमोळी अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली आणि पतीसोबत परदेशात स्थायिक झाली.

Marathi actress Sneha Kulkarni makes papad and kurdai in America, shares video | मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर

मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर

सिनेइंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्यासाठी अनेक कलाकार येतात. काहींना यश मिळतं तर काहींच्या पदरी अपयश येतं. काही जण निराश होऊन इंडस्ट्रीतून बाहेर पडतात तर काही इतर कारणास्तव अभिनय क्षेत्राला रामराम करतात. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री जिने रिएलिटी शोमधून कलाविश्वात पदार्पण केले. सिनेमा आणि मालिकेतून घराघरात पोहचली, पण कालांतराने तिने सिनेइंडस्ट्रीतून संन्यास घेतला. सध्या ही अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक आहे. ही अभिनेत्री कोण असेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर ही अभिनेत्री म्हणजे स्नेहा कुलकर्णी (Marathi Actress Sneha Kulkarni).

 स्नेहा कुलकर्णी लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली. खरेतर ती पतीसोबत परदेशात स्थायिक झाली. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांना प्रत्येक गोष्टींची अपडेट देत असते. ती उत्तम डान्सरदेखील आहे. ती डान्सचे व्हिडीओदेखील शेअर करत असते. स्नेहाने नुकताच इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती गव्हाच्या कुरडया आणि पापड बनवताना दिसते आहे. तिने संपूर्ण प्रोसेस सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात ती कुरडया पाडण्यापासून उन्हात वाळवताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते आहे. याआधी तिने गुलकंद बनवला होता. त्याचाही व्हिडीओ तिने शेअर केला होता.  


वर्कफ्रंट
अभिनेत्री स्नेहा कुलकर्णीने महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिएलिटी शोमधून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. त्यानंतर ती माझिया प्रियाला प्रीत कळेना मालिका आणि येड्यांची जत्रा या सिनेमात झळकली. मात्र अभिनेत्रीने लग्न केले आणि लग्नानंतर ती पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाली. तिथे ती अमेरिकन एअरलाइन्समध्ये काम करते आहे.

Web Title: Marathi actress Sneha Kulkarni makes papad and kurdai in America, shares video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.