ओळखा पाहू या मराठमोळ्या अभिनेत्रीला, बालकलाकार म्हणून केली होती करियरची सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 14:02 IST2019-09-04T14:01:57+5:302019-09-04T14:02:27+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीनं तिच्या पहिल्या मालिकेतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

ओळखा पाहू या मराठमोळ्या अभिनेत्रीला, बालकलाकार म्हणून केली होती करियरची सुरूवात
अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. नुकताच तिने एक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
श्रृतीनं तिच्या बालपणीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ती इयत्ता १०वीत असतानाचा फोटो असून त्यावेळी तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिने हा फोटो शेअर करत म्हणाली की, माझी पहिली मालिका पेशवाई. दहावी इयत्तामध्ये होते.
श्रृतीच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. इतकेच नाही तर मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार देखील कमेंट करताना दिसत आहे. कुणी म्हणतंय गोंडस तर कुणी म्हणतंय क्युट. इतकंच नाही तर अमेय वाघने देखील ही त्याची पहिली मालिका असल्याचं कमेंटमध्ये सांगितलं आहे.
अभिनेत्री श्रृती मराठे आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिका असो वा सिनेमा दोनही माध्यमात श्रृतीने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रृतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रृतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रृती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.