बोल्ड अँड ब्युटीफूल! "हमरी अटरीया पे"वर श्रुती मराठेने दाखवल्या कातिल अदा, हटके लूकने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 16:12 IST2024-07-02T16:11:32+5:302024-07-02T16:12:01+5:30

श्रुतीच्या एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे.  श्रुती मराठेने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

marathi actress shruti marathe reel video on hamari atariya pe song goes viral | बोल्ड अँड ब्युटीफूल! "हमरी अटरीया पे"वर श्रुती मराठेने दाखवल्या कातिल अदा, हटके लूकने वेधलं लक्ष

बोल्ड अँड ब्युटीफूल! "हमरी अटरीया पे"वर श्रुती मराठेने दाखवल्या कातिल अदा, हटके लूकने वेधलं लक्ष

'राधा ही बावरी' मालिकेतून अभिनेत्री श्रुती मराठे घराघरात पोहोचली. या मालिकेने श्रुतीला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये श्रुती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. श्रुतीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. सध्या श्रुतीच्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. 

श्रुती मराठेने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. श्रुतीने नुकतंच फोटोशूट केलं आहे. या व्हिडिओत तिने हिरव्या रंगाचा स्कर्ट परिधान करत हटके लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. डीप नेक टॉप घालत श्रुतीने बोल्ड अवतार केला आहे. खड्यांचे दागिने आणि केसाचा बन बांधून त्यावर गुलाब माळल्याचं दिसत आहे. श्रुतीचा हा हटके लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. "हमरी अटरीया पे" या गाण्यावर तिने रील व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत ती फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. तिच्या अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रुतीच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

मराठी सिनेसृष्टीबरोबरच श्रुतीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीही गाजवली आहे. अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये ती झळकली आहे. अभिनेत्रीबरोबरच श्रुती निर्मातीदेखील आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या अलिबाबा आणि चाळीस चोर सिनेमात ती दिसली होती. रमा माधव, धर्मवीर, सनई चौघडे, शुभ लग्न सावधान, तप्तपदी या सिनेमांमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारल्या. तर सरसेनापती हंबीरराव सिनेमात ती पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसली. 

Web Title: marathi actress shruti marathe reel video on hamari atariya pe song goes viral