बाप्पाच्या आगमनासाठी श्रुती सज्ज; ढोलताशाची प्रॅक्टीस करताना शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 17:45 IST2022-08-24T17:45:00+5:302022-08-24T17:45:00+5:30

Shruti marathe: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या श्रुतीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ढोलताशाची प्रॅक्टीस करतानाचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

marathi actress shruti marathe dhol tasha video | बाप्पाच्या आगमनासाठी श्रुती सज्ज; ढोलताशाची प्रॅक्टीस करताना शेअर केला व्हिडीओ

बाप्पाच्या आगमनासाठी श्रुती सज्ज; ढोलताशाची प्रॅक्टीस करताना शेअर केला व्हिडीओ

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच आनंदाचं, मांगल्याचं वातावरण निर्माण झालं आहे.  अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करताना दिसत आहे. अगदी गणरायाची मूर्ती निवडण्यापासून ते डेकोरेशनपर्यंत सारं काही मोठ्या थाटात करण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरु आहे. यात सेलिब्रिटीदेखील उत्साहात सगळं करत असल्याचं दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री श्रुती मराठे (shruti marathe) हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती ढोलताशाचा सराव करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या श्रुतीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ढोलताशाची प्रॅक्टीस करतानाचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासह ढोलताशा पथकातील सदस्य प्रॅक्टीस करताना दिसत आहेत. 

श्रुती उत्तम वादक असून ती दरवर्षी बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होऊन ढोल-ताशा वाजवते. त्यामुळे २ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता पुन्हा एकदा श्रुती वादनाकडे वळली आहे.  दरम्यान, श्रुतीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये आहे. तसंच तिने कंबरेला ढोल बांधला असून तो वाजवताना दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून श्रुती ढोलताशा पथकातील वादक आहे. श्रुतीसह या व्हिडीओमध्ये मराठी कलाविश्वातील काही लोकप्रिय कलाकारही दिसून येत आहेत.
 

Web Title: marathi actress shruti marathe dhol tasha video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.