"अजिंक्य माझे पती अन्...", शिवानीने नवऱ्यासाठी लग्नात घेतला खास उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 15:31 IST2024-02-02T15:29:18+5:302024-02-02T15:31:54+5:30

शिवानीने लग्नात अजिंक्यसाठी खास उखाणा घेतला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. 

marathi actress shivani surve special ukhana for husband ajinkya nanaware video viral | "अजिंक्य माझे पती अन्...", शिवानीने नवऱ्यासाठी लग्नात घेतला खास उखाणा

"अजिंक्य माझे पती अन्...", शिवानीने नवऱ्यासाठी लग्नात घेतला खास उखाणा

मराठी कलाविश्वातील आणखी एक जोडपं विवाहबंधनात अडकलं आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी गुरुवारी(१ फेब्रुवारी) कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सातफेरे घेत लग्नगाठ बांधली. ठाण्यातील येऊर येथील रिसॉर्टमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिवानीने लग्नात अजिंक्यसाठी खास उखाणाही घेतला. याचा व्हिडिओही आता समोर आला आहे. 

मोठ्या थाटामाटात शिवानी आणि अजिंक्यचा विवाहसोहळा पार पडला. त्यांनी लग्नासाठी खास शाही लूक केला होता. शिवानीने बदामी रंगाचा लेहेंगा परिधान करत बॉलिवूड अभिनेत्रीसारखा लूक केला होता. तर अजिंक्यने सूट परिधान करत डोक्यावर फेटा बांधला होता. लग्नात नववधू शिवानीने अजिंक्यसाठी खास उखाणा घेतला. याचा व्हिडिओ सेलिब्रिटी प्रमोटर्स या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला आहे. "एक वाती एक ज्योती, अजिंक्य माझे पती अन् मी त्यांची सौभाग्यवती", असा उखाणा शिवानीने अजिंक्यसाठी घेतला. शिवानी-अजिंक्यच्या लग्नात मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. 

'देवयानी' मालिकेतून शिवानी घराघरात पोहोचली. 'बिग बॉस मराठी'मध्येही शिवानी सहभागी झाली होती. त्यानंतर अनेक मराठी सिनेमांमध्येही शिवानी झळकली. 'वाळवी', 'ट्रिपल सीट', 'घंटा' या चित्रपटांतही तिने काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' सिनेमात शिवानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. 

शिवानीबरोबरच अजिंक्यदेखील अभिनेता आहे. सध्या तो झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. 'कुसूम' या मालिकेतही तो झळकला होता. तर 'पावनखिंड' सिनेमात अजिंक्य महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेच्या सेटवर अजिंक्य आणि शिवानी पहिल्यांदा भेटले होते. तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

Web Title: marathi actress shivani surve special ukhana for husband ajinkya nanaware video viral