'झिम्मा २' फेम सायली संजीवने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 12:58 IST2024-01-13T12:57:47+5:302024-01-13T12:58:04+5:30

सोशल मीडियापासून काही काळ लांब राहायचं, असं सायलीने ठरवलं आहे. याबाबत तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

marathi actress sayali sanjeev take small break from social media shared post | 'झिम्मा २' फेम सायली संजीवने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक, नेमकं कारण काय?

'झिम्मा २' फेम सायली संजीवने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक, नेमकं कारण काय?

सायली संजीव ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'काहे दिया परदेस' या मालिकेतून सायली घराघरात पोहोचली. पहिल्याच मालितेने सायलीला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमधून सायलीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सायलीचा चाहता वर्गही मोठा आहे. सोशल मीडियावरुन सायली चाहत्यांना तिच्या नवीन प्रोजेक्टबाबत माहिती द्यायची. तसंच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही ती शेअर करताना दिसायची. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

पण, सायलीने आता सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियापासून काही काळ लांब राहायचं, असं सायलीने ठरवलं आहे. याबाबत तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. "सोशल मीडियावरुन छोटा ब्रेक घेत आहे. लवकरच परत येईन...लव्ह आणि गुड नाईट", असं म्हणत सायलीने पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे आता सायली काही दिवस सोशल मीडियावर सक्रिय नसल्याचं नसणार आहे. 

सायलीने 'गोष्ट एका पैठणीची', 'बस्ता', 'मन फकिरा', 'झिम्मा', 'सातारचा सलमान', 'आटपाडी नाईट्स' या चित्रपटांत काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २'मध्ये सायली दिसली होती. हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या सिनेमातील सायलीच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं. 

Web Title: marathi actress sayali sanjeev take small break from social media shared post