फोटोतील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? बिग बींसोबत केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 11:58 IST2026-02-23T11:58:01+5:302026-02-23T11:58:42+5:30
Marathi actress: एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

फोटोतील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? बिग बींसोबत केलंय काम
सध्याच्या काळात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम मानलं जातं. त्यामुळेच अनेक कलाकार या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक कलाकार त्यांच्या जीवनातील लहान-मोठे अपडेट्स सुद्धा चाहत्यांसोबत शेअर करतात. यामध्येच सध्या एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत. या अभिनेत्रीने नागराज मंजुळे यांच्या 'घर, बंदुक, बिरयानी' या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अभिनयासोबतच ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळेही कायम चर्चेत असते.
नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत असलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सायली पाटील आहे. सायली कायम तिचे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात येत असते. यावेळी तिने तिचे गोवा ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.सायलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कूल अंदाजात दिसत आहे. या लाइट यल्लो रंगाचा शर्ट आणि व्हाईट कलरची शॉर्ट्स तिने परिधान केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनीही कमेंटचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान,सायलीने 'झुंड', 'घर, बंदूक, बिरयानी', 'येक नंबर' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिराती, म्युझिक अल्बममध्येही ती झळकली आहे.