'कृष्ण' रूपातील 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:47 IST2025-10-27T13:46:30+5:302025-10-27T13:47:11+5:30
अभिनेत्रीचा संपूर्ण 'कृष्ण' अवतार अत्यंत सुंदर वाटत आहे.

'कृष्ण' रूपातील 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
एका लोकप्रिय अभिनेत्रीचा 'कृष्ण' अवतार समोर आला आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीनं अप्रतिम असा 'कृष्ण' अवतार साकारलाय. डोक्यावर मोरपीस, गळ्यात सुंदर फुलांच्या माळा, हातात बासरी आणि चेहऱ्यावर शांत, मोहक भाव असा अभिनेत्रीचा संपूर्ण 'कृष्ण' अवतार अत्यंत सुंदर वाटत आहे.
'कृष्ण' रूपातील ही अभिनेत्री दुसरी कुणी नाही तर संस्कृती बालगुडे ही आहे. संस्कृती बालगुडे नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र, नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ तिच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का ठरला आहे. या व्हिडीओमध्ये संस्कृतीने साकारलेला लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संस्कृती या व्हिडीओमध्ये थेट श्रीकृष्णच्या रूपात दिसली आहे.
विशेष म्हणजे या लूकमध्ये संस्कृती आहे, हे ओळखणे कठीण जातंय. व्हिडीओसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, "……नमस्कार..! मी कृष्ण !…..अमर्यादा… पुरुषोत्तम… कृष्ण…!!". साधारणपणे ग्लॅमरस वेस्टर्न किंवा पारंपरिक साडीतील लूकसाठी ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीने हा पौराणिक लूक स्वीकारल्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तिच्या या वेगळ्या छटेचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत. संस्कृती एक उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. त्यामुळे या अवतारात तिचे शांत आणि मोहक भाव (Expressions) अधिक प्रभावी वाटत आहेत. तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि कृष्णाची शांत मुद्रा तिने उत्तमरित्या साकारली आहे.
संस्कृतीनं हा खास लूक कोणत्या आगामी प्रोजेक्टसाठी केला आहे, हे स्पष्ट केले नसले तरी, तिचा हा व्हिडीओ सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय ठरला आहे. संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. संस्कृतीनं 'पिंजरा' मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. आनंदीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर विवाह बंधन, काळे धंदे यासारख्या तिच्या काही मालिका गाजल्या. 'सांगतो ऐका' चित्रपटातून तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं. शॉर्टकट, निवडुंग, एफयू, सर्व लाईन व्यस्त आहेत असे काही सिनेमेही गाजले.