अभिनयानंतर 'या' श्रेत्रात पदार्पण करतेय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 07:00 IST2020-10-27T07:00:00+5:302020-10-27T07:00:02+5:30

सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

Marathi actress sai tamhankar is making her debut in this field | अभिनयानंतर 'या' श्रेत्रात पदार्पण करतेय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर

अभिनयानंतर 'या' श्रेत्रात पदार्पण करतेय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकरने  मराठी फिल्म इंडस्ट्री आणि फॅशनविश्व गाजवल्यावर आता एका नव्या क्षेत्रात पदार्पण करते आहे. सई ताम्हणकरने आपलं स्वत:चं ‘दि सारी स्टोरी’ हे लेबल लाँच केलं आहे. 

सईने  मराठी सिनेसृष्टीसोबतच फॅशन दुनियेत ही स्वत:च नाव कमावलेलं आहे. सईने नेहमीच वेगळी वाट चोखाळलीय आणि प्रत्येक संधीचं सोनं केलंय. आता फॅशनिस्टा सई ‘दि सारी स्टोरी’ हे आपलं स्वत:चं लेबल घेऊन आली आहे. अनेकजणी सईला आपली ‘रोल मॉडेल’ मानतात. 

आपली कॉलेजपासूनची मैत्रीण श्रुती भोसले-चव्हाणसोबत सईने हे लेबल लाँच केले आहे. सई ताम्हणकर म्हणते, “कॉलेजमध्ये असल्यापासूनच आपण दोघी मिळून काहीतरी नवीन करूया, असं मला आणि श्रुतीला नेहमी वाटत असे. पण काय नवं ते उमजतं नव्हतं. पुढे आम्ही दोघीही आपापल्या क्षेत्रात करियर करण्यात गुंतून गेलो. पण 2020 ने आम्हाला नव्या कल्पनांवर विचार करायची संधी दिली. आणि आता  ‘दि सारी स्टोरी’ने आमचं स्वप्न आकाराला येतंय.”

‘दि सारी स्टोरी’मध्ये ‘सई टच’ काय असेल असं विचारल्यावर सई सांगते, “माझ्या सिनेमा आणि भूमिकांबाबत जशी मी चोखंदळ आहे ना, अगदी तशीच साड्यांबाबतही आहे. प्रत्येक साडीचा पोत, रंग, डिझाइन ह्यावर माझं आणि श्रुतीचं बारकाईने लक्ष असणार आहे. जसे माझ्या प्रत्येक चित्रपटाला एक कथानक असते. तसेच आमच्या लेबलची साडीही एखादी गोष्ट उलगडावी तशीच सुरेख असेल.”
 

Web Title: Marathi actress sai tamhankar is making her debut in this field