भररस्त्यात बेभान होऊन नाचली सई ताम्हणकर, व्हिडिओची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:42 PM2023-10-16T12:42:13+5:302023-10-16T12:44:46+5:30

सईने नुकत्याच शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत ती भररस्यात उभ्या असलेल्या गाडीत बेभान होऊन नाचताना दिसत आहे.

marathi actress sai tamhankar dance in car on road video goes viral | भररस्त्यात बेभान होऊन नाचली सई ताम्हणकर, व्हिडिओची होतेय चर्चा

भररस्त्यात बेभान होऊन नाचली सई ताम्हणकर, व्हिडिओची होतेय चर्चा

अभिनयाची जादू प्रेक्षकांवर पाडणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. अगदी कमी वेळात सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण करणारी सई आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 'सनई चौघडे',' बालक पालक', 'क्लासमेट्स', 'व्हाय झेड' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांतून सईने अभिनयाची छाप पाडली. 'नो एन्ट्री : पुढे धोका आहे' या चित्रपटातील सईचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले होते. मराठीबरोबरच सईने बॉलिवूडमध्येही नाव कमावलं. 'हंटर', 'मिमी' या चित्रपटांमध्ये सई महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली.

सई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. बोल्डनेसने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या सईचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सई सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. सईने नुकत्याच शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. सईने तिच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती भररस्यात उभ्या असलेल्या गाडीत बेभान होऊन नाचताना दिसत आहे. या व्हिडिओला सईने "मी चांगला टेक दिल्यानंतर सेलिब्रेट करताना" असं कॅप्शन दिलं आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, सईने नुकतंच मुंबईत स्वत:च घर खरेदी केलं आहे. सईने युट्यूब चॅनेवरील व्हिडिओतून तिच्या आलिशान घराची झलक दाखवली होती. सध्या सई 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे.

Web Title: marathi actress sai tamhankar dance in car on road video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.