भावाच्या लग्नाच्या वरातीत ऋतुजा बागवेने केला जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 17:10 IST2023-12-19T17:10:03+5:302023-12-19T17:10:27+5:30
Rutuja bagwe: पहिल्यांदाच ऋतुजाचा एक नवा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

भावाच्या लग्नाच्या वरातीत ऋतुजा बागवेने केला जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे (rutuja bagwe). गेल्या काही दिवसांपासून ऋतुजा सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत आहे. नुकतेच तिचे लंडन मिसळ आणि सोंग्या हे दोन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती भावाच्या वरातीमध्ये मनमुरादपणे डान्स करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या ऋतुजाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या भावाच्या लग्नातील काही क्षण कैद केले आहेत. विशेष म्हणजे भावाच्या लग्नात तिने कशी मज्जा केली हे या व्हिडीओच्या माध्यमातून तिने सांगितलं आहे. सोबतच त्याला कॅप्शनही तसंच दिलं आहे.
ऋतुजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती लग्नाच्या वरातीत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. लग्नाची वरात हॉलच्या गेटवर आल्यानंतर ऋतुजाने चांगलाच ताल धरला. हा व्हिडीओ शेअर करत, “माझा चुलत भाऊ विवाहबंधनात अडकत आहे. त्याचवेळी मी”. नाचा, खा आणि आनंदी राहा” असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सोबतच तिने ‘सिंगल लाईफ’ असा हॅशटॅगदेखील वापरला आहे.
दरम्यान, ऋतुजा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा असा सगळ्या माध्यमांमध्ये तिचा दांडगा वावर आहे. 'चंद्र आहे साक्षीला', 'नांदा सौख्य भरे', 'अनन्या' अशा नाटक, मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.