मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई! लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात, शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 18:05 IST2025-12-12T18:05:16+5:302025-12-12T18:05:41+5:30
सध्या मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. पूजा बिरारी-सोहम बांदेकर, तेजस्विनी लोणारी, प्राजक्ता गायकवाड यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीच्या घरी सनई चौघडे वाजत आहेत.

मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई! लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात, शेअर केले फोटो
सध्या मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. पूजा बिरारी-सोहम बांदेकर, तेजस्विनी लोणारी, प्राजक्ता गायकवाड यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीच्या घरी सनई चौघडे वाजत आहेत. अभिनेत्री रितिका श्रोत्रीच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
रितिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने साडीत पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर हातात हिरव्या बांगड्याही घातल्या आहेत. यावरुन रितिकाचंच लग्न आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, रितिकाच्या घरी लगीनघाई सुरू असली तरी लग्न तिचं होत नाहीये. रितिकाच्या भावाचं लग्न आहे. भावाच्या लग्नात रितिका करवली बनून मिरवणार आहे. 'दादाचं लग्न' असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी "तुझं लग्न कधी?" असंही विचारलं आहे.
रितिकाने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. टकाटक, मु.पो. बोंबिलवाडी, बॉइज ४, बॉइज, डार्लिंग, लंडन मिसळ या सिनेमांमध्ये ती दिसली होती. तर रेड २ या बॉलिवूड सिनेमातही रितिकाने छोटा रोल केला होता.