गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी अन्...; रिंकू राजगुरूचा 'तो' फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 12:57 IST2023-11-03T12:56:41+5:302023-11-03T12:57:27+5:30

रिंकूने पोस्ट केलेल्या अशाच एका फोटोची सध्या चर्चा रंगली आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे.

marathi actress rinku rajguru photo of wearing mangalsutra and green saree goes viral | गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी अन्...; रिंकू राजगुरूचा 'तो' फोटो चर्चेत

गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी अन्...; रिंकू राजगुरूचा 'तो' फोटो चर्चेत

'सैराट' चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली सगळ्यांची लाडकी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू. पहिल्याच चित्रपटाने लोकप्रियता मिळवून दिलेल्या रिंकूने नंतर विविधांगी भूमिका साकारत अभिनयाचा ठसा उमटवला. 'कागर', 'आठवा रंग प्रेमाचा', 'मेकअप' या चित्रपटांत मुख्य भूमिकेत रिंकू झळकली. लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी रिंकू अनेकांची क्रश आहे. रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

आगामी प्रोजेक्टबरोबरच अनेकदा रिंकू तिचे फोटोही पोस्ट करताना दिसते. रिंकूने पोस्ट केलेल्या अशाच एका फोटोची सध्या चर्चा रंगली आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रिंकू हिरव्या रंगाची साडी नेसून बसलेली दिसत आहे. तिने गळ्यात मंगळसूत्री घातलं आहे. त्याचबरोबरच रिंकूच्या पायात जोडवीही दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. रिंकूचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रिंकूचा हा फोटो म्हणजे तिच्या आगामी चित्रपटातील लूक आहे. नुकतंच तिने या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आठवण म्हणून रिंकूने हा फोटो तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. रिंकूचा चित्रपटातील हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. 

दरम्यान, लवकरच रिंकू नव्या कोऱ्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू 'झुंड' या हिंदी सिनेमातही झळकली होती. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. '२०० हल्ला हो' आणि 'हंड्रेड' या वेब सीरिजमध्येही रिंकू महत्त्वाच्या भूमिकेत होती.  

 

Web Title: marathi actress rinku rajguru photo of wearing mangalsutra and green saree goes viral