प्रार्थना बेहेरे करत आहे 'या' आजाराचा सामना, अभिनेत्रीने स्वतः दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 12:21 IST2025-03-02T12:19:40+5:302025-03-02T12:21:14+5:30

अभिनेत्री सध्या एका आजाराचा सामना करतेय.

Marathi Actress Prarthana Behere Suffering From Thyroid | प्रार्थना बेहेरे करत आहे 'या' आजाराचा सामना, अभिनेत्रीने स्वतः दिली माहिती

प्रार्थना बेहेरे करत आहे 'या' आजाराचा सामना, अभिनेत्रीने स्वतः दिली माहिती

Prarthana Behere : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखलं जातं. आजवर तिने अनेक मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या गोड स्वभावामुळे प्रार्थना नेहमीच सर्वांचं मन जिंकून घेते. आज प्रार्थना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.  अभिनेत्री सध्या एका आजाराचा सामना करतेय. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रार्थनाने स्वत: ही माहिती दिली.

पार्थना बेहरेनं नुकतंच सुमन म्युझिकच्या 'आम्ही असं ऐकलंय' या सेगमेंटमध्ये मुलाखत दिली. यावेळी तिनं आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी चाळीशीत थायरॉईड (Prarthana Behere Suffering From Thyroid ) झाल्याची महिती तिनं दिली.   मुलाखतीमध्ये तिला 'स्कीनकेअर रुटिनविषयी विचारण्यात आलं.  त्यावर ती म्हणाली, "मी पूर्वी माझ्या त्वचेची फारशी काळजी घेत नव्हते. पण आता मी पुन्हा स्किनकेअर रुटीनकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. रात्री मेकअप काढून मी नेहमी नाईट क्रीम लावते. काही काळ मी आळस केल्यामुळे माझ्या त्वचेवर त्याचा परिणाम झाला. त्यात मला थायरॉईड असल्याने माझी त्वचा कोरडी पडते. म्हणूनच मी आता डे क्रीम आणि नाईट क्रीम दोन्हीही नियमित लावते". 


प्रार्थना बेहेरेने तिच्या फिटनेसचे रहस्यही सांगितलं. ती म्हणाली, "मी कायम आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमचे तुमच्या शरीराकडे लक्ष असते. पण जेव्हा दु:खी असता किंवा तणावत असता तेव्हा तुमचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते". पार्थनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिचा 'चिकी चिकी बुमबूम' हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे ती जोरदार प्रमोशन करत आहे. 

Web Title: Marathi Actress Prarthana Behere Suffering From Thyroid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.