पूजा सावंतचा लग्नातील पहिला लूक आला समोर; बहिणीने शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 12:38 IST2024-02-28T12:38:22+5:302024-02-28T12:38:40+5:30

Pooja sawant: पूजाने लग्नासाठी खास साडी आणि त्यावर हेवी ज्युलरी परिधान केली आहे. त्यामुळे तिचा लूक प्रचंड खुलून आला आहे.

marathi actress pooja sawant wedding first bridal look | पूजा सावंतचा लग्नातील पहिला लूक आला समोर; बहिणीने शेअर केला खास व्हिडीओ

पूजा सावंतचा लग्नातील पहिला लूक आला समोर; बहिणीने शेअर केला खास व्हिडीओ

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत (Pooja sawant) हिची लग्नघटिका समीप आली आहे. येत्या काही तासांमध्ये तिच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत. आणि सावंतांची लेक चव्हाणांच्या घरची सून होणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्येच पूजाच्या वधूच्या लूकमधील पहिला फोटो समोर आला आहे.

मराठी कलाविश्वात आणि सोशल मीडियावर पूजाच्या लग्नापूर्वीच्या प्रत्येक कार्यक्रमाची, विधीची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा रंगली. अगदी मेहंदीपासून ते संगीत, हळद प्रत्येक सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यामध्येच आता पूजा लग्नमंडपात जायला तयार झाली असून तिचा पहिला लूक समोर आला आहे.

पूजाची बहीण रुचिरा हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक रील शेअर केलं आहे. यामध्ये पूजा वधूच्या लूकमध्ये दिसत असून तिच्या कपाळी मुंडावळ्या बांधल्याचंही दिसून येत आहे.  रुचिराने हा व्हिडीओ शेअर करत 'गोरी गौरी मांडवाखाली...; हे गाणं बॅकग्राऊंडला प्ले केलं आहे. रुचिराचा हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, पूजाने तिच्या खास दिवशी किंचित गड रंगाची स्काय ब्ल्यू कलरची साडी नेसली आहे. सोबतच हेवी ज्युलरी परिधान केली आहे. पूजाने लग्नासाठी खास मराठमोळा पारंपरिक लूक केल्याचं या व्हिडीओमधून दिसून येत आहे. पूजा सिद्धेश चव्हाण याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. सिद्धेश सध्या ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असून पूजाही काही काळासाठी त्याच्यासोबत तिकडे शिफ्ट होणार आहे.

Web Title: marathi actress pooja sawant wedding first bridal look