"जेव्हा प्रेमावरुन विश्वास उडाला होता...", मिस्टर चव्हाणला पूजाने खास अंदाजात केलं प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 12:26 IST2024-02-19T12:26:21+5:302024-02-19T12:26:57+5:30

साखरपुड्यात पूजाने होणाऱ्या नवऱ्याला खास अंदाजात प्रपोज करत लग्नाची मागणी घातली.

marathi actress pooja sawant express her feelings to siddhesh chavan propose him engagement video viral | "जेव्हा प्रेमावरुन विश्वास उडाला होता...", मिस्टर चव्हाणला पूजाने खास अंदाजात केलं प्रपोज

"जेव्हा प्रेमावरुन विश्वास उडाला होता...", मिस्टर चव्हाणला पूजाने खास अंदाजात केलं प्रपोज

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. अनेक सिनेमांतून काम करत प्रेक्षकांना भुरळ घालणारी पूजा लवकरच तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. नुकताच पूजा आणि सिद्धेश चव्हाणचा साखरपुडा पार पडला. तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पूजाने साखरपुड्यातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

साखरपुड्यात पूजाने होणाऱ्या नवऱ्याला खास अंदाजात प्रपोज करत लग्नाची मागणी घातली. या व्हिडिओत पूजा म्हणते, "मिस्टर सिद्धेश चव्हाण...जेव्हा कुठेतरी प्रेमावरील विश्वास उडून गेला होता. मला कधीच वाटलं नव्हतं की मी कुणावर इतकं प्रेम करू शकते. तू आलास आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. जर तू विचारलं नसतंस मला तर कदाचित मीच विचारलं असतं तुला...पण, आज सर्वांच्या समोर मी तुला विचारते की माझ्याशी लग्न करशील का?" 

पूजाच्या या व्हिडिओत साखरपुड्यातील खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. पूजाने काही महिन्यांपूर्वीच प्रेमाची कबुली दिली होती. पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. पूजा आणि सिद्धेश लवकरच विवाहबंधनात अकडून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. 

Web Title: marathi actress pooja sawant express her feelings to siddhesh chavan propose him engagement video viral