मन धागा धागा जोडते नवा! अभिनेत्री पूजा सावंतने केला साखरपुडा, जोडीदाराच्या नावाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 11:24 IST2023-11-28T11:18:26+5:302023-11-28T11:24:19+5:30

पूजा सावंतने जोडीदारासोबत रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.

marathi actress Pooja Sawant engaged post romantic photos viral who is the lucky guy | मन धागा धागा जोडते नवा! अभिनेत्री पूजा सावंतने केला साखरपुडा, जोडीदाराच्या नावाची चर्चा

मन धागा धागा जोडते नवा! अभिनेत्री पूजा सावंतने केला साखरपुडा, जोडीदाराच्या नावाची चर्चा

मराठीमध्ये सध्या लग्नाचा सिझनच सुरु आहे. कोणाचा साखरपुडा तर कोणी लग्नबंधनात अडकत आहे. नुकतंच 'बिग बॉस' फेम कलाकार अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लग्नबंधनात अडकले. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने आयुष्यातील पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत (Pooja Sawant) आहे. पूजाने आपला साखरपुडा झाल्याची घोषणा केली आहे. 

पूजा सावंतने नुकताच सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. यामध्ये पूजा एका मुलाच्या मिठीत दिसत आहे. त्या मुलाचा फोटो मात्र पाठमोरा आहे त्यामुळे तो नक्की कोण हे अजून गुलदस्त्यातच आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हा रोमँटिक फोटो तिने शेअर केलाय. दोघंही पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत. तसंच तिच्या बोटात अंगठीही दिसत आहे. 'एका खास व्यक्तीसोबत नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहे. वी आर एन्गेज्ड' असं कॅप्शनही पूजाने दिलं आहे. 

पूजा नक्की कोणाच्या प्रेमात आहे, तिचा होणारा नवरा कोण असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. या पोस्टवर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. पूजाची बहीण रुचिरा सावंत हिने अभिनंदन 'दी अँड जिजू' अशी पोस्टही टाकली आहे. सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर जोग, सायली संजीव यांनीही कमेंट करत पूजाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: marathi actress Pooja Sawant engaged post romantic photos viral who is the lucky guy