"तू पती म्हणून लाभणं...", अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 08:58 IST2025-06-05T08:56:20+5:302025-06-05T08:58:29+5:30

"तुझ्या आयुष्यात सहभागी होणं...", अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, कारणही आहे खास 

marathi actress nivedita saraf shared special post for husband ashok saraf netizens react | "तू पती म्हणून लाभणं...", अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, व्यक्त केल्या भावना

"तू पती म्हणून लाभणं...", अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, व्यक्त केल्या भावना

Nivedita Saraf: मराठी रंगभूमी आणि मराठी सिनेजगतामध्ये भरीव योगदान देणाऱ्या कलाकारांच्या यादीत अशोक सराफ (Ashok Saraf)यांचं नाव अग्रस्थानी येतं. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठीसह हिंदी प्रेक्षकांचंही मनोरंजन केलं. अलिकडेच अशोक सराफ यांचा भारत सरकारकडून पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. अशातच काल अशोफ सराफ यांच्या ७८ वा वाढदिवस होता, त्यांच्या वाढदिवसानिमितही कलाकार व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात आता त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी सोशल मीडियावर अतिशय सुंदर शब्दांत पोस्ट लिहून पतीचं कौतुक केलं आहे.


अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच आत निवेदिता सराफ यांनी सोशल मीडिया तुला पती म्हणून लाभणं हीच माझी मोठी भाग्याची गोष्ट आहे… तुझ्या आयुष्याच्या प्रवासाचा मी एक भाग आहे, याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. तू एक महान मुलगा, भाऊ, पती आणि वडील आहेस आणि त्याहूनही मोठं म्हणजे तू एक चांगलं माणूस आहेस. तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम राहील… वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा अशोक तुझ्या आयुष्यात सहभागी होणं हीच माझी खरी श्रीमंती आहे…! अशी पोस्ट लिहून निवेदता यांनी अशोक सराफांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांची आवडती जोडी आहे. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक वर्ष ते दोघेही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अनेक सिनेमांमध्येही ते एकत्र काम करताना दिसले. ही जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. 

Web Title: marathi actress nivedita saraf shared special post for husband ashok saraf netizens react