अभिनेत्री नेहा पेंडसेच्या फिटनेसचं रहस्य आलं समोर, ‘या’ गोष्टींना देते जास्त प्राधान्य, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:40 IST2026-03-04T12:26:50+5:302026-03-04T12:40:38+5:30

वय हा फक्त आकडाच! धावपळीच्या कामातून नेहा पेंडसे स्वत:ला कशी ठेवते फिट? म्हणाली-"शूट असतं तेव्हा मी..."

marathi actress neha pendse share her fitness journey and talk about diet plan  | अभिनेत्री नेहा पेंडसेच्या फिटनेसचं रहस्य आलं समोर, ‘या’ गोष्टींना देते जास्त प्राधान्य, म्हणाली...

अभिनेत्री नेहा पेंडसेच्या फिटनेसचं रहस्य आलं समोर, ‘या’ गोष्टींना देते जास्त प्राधान्य, म्हणाली...

Neha Pendase: सध्याच्या धावपळीच्या युगात निरोगी आरोग्यासाठी काही नियम आणि गोष्टींचं पालन करणं गरजेचं असतं. बदललेल्या जीवनशैलीमुळे योग्य आणि सकस आहार घेणं आवश्यक बनलं आहे. अनेकदा योगा, व्यायाम, फिटनेस यासारख्या गोष्टी किचकट वाटू लागतात. मात्र आपण अनेक सेलिब्रिटींना पाहिल्यानंतर त्यांच्या फिटनेसबद्दल आपल्याला सहज आकर्षण निर्माण होते. यासाठी ते नेमकं काय करतात, असा प्रश्नही अनेकांना पडतो. हे सर्व सेलिब्रिटी त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढून त्यांच्या आहाराकडे योग्यरित्या लक्ष देत असल्याने ते फिट असतात.अशीच एक मराठीतील अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.

नेहा पेंडसेने आतापर्यंत तिच्या अभिनयाने आणि निखळ सौंदर्यांने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नेहा आता ४१ वर्षांची आहे. मात्र, पडद्यावर तिचं सौंदर्य आणि फिटनेस पंचवीशीतल्या तरुणींना लाजणारा आहे. नेहा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तिच्या डाएट प्लॅनकडे विशेष लक्ष देत असते. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, "सेम दिसण्याचं प्रेशर माणसाने का घ्यावं? म्हणजे त्या-त्या वयाचे ते-ते टप्पे आपण आनंदाने जगलो पाहिजेत. तुम्हाला विशीमध्ये चांगलं दिसण्याचं प्रेशर असतं. या वयात प्रत्येकजण यातून जात असतो. पण, मला वाटतं एका ठराविक काळानंतर आपण याचा विचार करणं सोडून देतो."

यानंतर नेहाला, वेट लॉस आणि वेट गेनचं तुला टेन्शन असतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, "हो,मला वजन कमी-जास्त होतं याचं कायम टेन्शन होतं. माझ्या घरी म्हणालात तर, फक्त माझे वडील स्वत:ला सांभाळून आहेत. बाकी सगळे शंभर किलोच्या वर आहेत. त्यामुळे याचं टेन्शन असतंच. पण, आपण क्षेत्रंच असं निवडलंय तर या सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. वर्षानुवर्ष मी एक लाईफस्टाईल मेन्टेन केली आहे. मी लहानपणापासून इंडस्ट्रीत काम करते आहे. शिवाय खाण्याच्या बाबतीतल्या या गोष्टींची लहानपणापासून सवय असल्यामुळे आता ते सोडवत पण नाही.स्वत:ला फिट पाहण्याची सवय झाली आहे. "

धावपळीच्या कामातून नेहा 'असं' देते स्वत:कडे लक्ष!  

या मुलाखतीत ती म्हणाली,"जेव्हा मी शूटिंग करते तेव्हा खूप जास्त स्ट्रिक्ट डाएटवर जाते. आणि जेव्हा मी शूट करत नसते तेव्हा वर्कआऊट चालू असतंच. पण, शूट नसताना मी तेव्हा जरा जास्त खाते. वेकेशनला असताना तर अजून खाते. मग घरी आल्यानंतर अगदी तोंडाला कुलूप असतं. वयाच्या विशीत मी स्वत:ला ती मुभाच दिली नाही. म्हणून जास्त काळासाठी मी मेन्टेन राहू शकले. आता खूप सोयीस्करित्या मी त्यावर मात करते. आता काम कमी असेल तर मी वाटेल तेवढं खाते. खूप खात नाही पण जे पाहिजे ते खाते." असं अभिनेत्रीने सांगितलं. 

वर्कफ्रंट

नेहा पेंडसेनं मराठीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे. नेहा, 'मे आय कम इन मॅडम' या हिंदी आणि 'भाग्यलक्ष्मी' या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचली. नेहानं २०२० मध्ये उद्योगपती शार्दूल बायससोबत लग्न केलं. 

Web Title : नेहा पेंडसे का फिटनेस रहस्य खुला: आहार, व्यायाम को प्राथमिकता।

Web Summary : अभिनेत्री नेहा पेंडसे, 41, संतुलित आहार और व्यायाम से फिटनेस बनाए रखती हैं। शूटिंग के दौरान सख्त आहार और ब्रेक के दौरान भोजन का आनंद लेती हैं, बचपन से बनाए जीवनशैली पर जोर देती हैं। वह अनुशासन के साथ आनंद को संतुलित करती हैं, साबित करती हैं कि उम्र सिर्फ एक संख्या है।

Web Title : Neha Pendse's fitness secret revealed: Prioritizes diet, workout balance.

Web Summary : Actress Neha Pendse, 41, maintains fitness through balanced diet and workout routine. She focuses on strict diets during shoots and enjoys food during breaks, emphasizing a lifestyle maintained since childhood. She balances enjoyment with discipline, proving age is just a number.