ओळखलंत का तुम्ही हिला ? अमेरिकेत शिकलेली ही मराठमोळी अभिनेत्री आहे उत्कृष्ट सतार वादक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 16:50 IST2021-02-20T16:26:33+5:302021-02-20T16:50:37+5:30
This marathi actress complete her study from USA : युएसएमधील टेक्सास येथील ट्रिंबल टेक हायस्कूलमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

ओळखलंत का तुम्ही हिला ? अमेरिकेत शिकलेली ही मराठमोळी अभिनेत्री आहे उत्कृष्ट सतार वादक
अभिनेत्री नेहा महाजनने मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे. मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. 'जीबून संदेश' या आोरिया फिल्ममध्ये भूमिका केल्या आहेत. 'द पेंटेड हाऊस' या सिनेमातून तिने २०१५ साली मॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असून ती तिच्या प्रोजेक्टविषयी माहिती आणि तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. बोल्ड, हॉट आणि सेक्सी असलेली ही अभिनेत्री तितकीच हुशारही आहे. नेहा ही फिटनेस फ्रिकही आहे.
नेहाला अभिनयासोबतच सतार वादनाचीदेखील आवड आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. नेहाचे वडील पंडित विदुर महाजन हे प्रसिद्ध सतार वादक आहेत. वडिलांना सतार वाजवताना पाहून नेहा देखील या वाद्याच्या प्रेमात पडली. वडिलांसोबत नेहा कार्यक्रमात सहभाग घेते. नेहाचा जन्म हा भारतातील असला तरी नेहाने युएसएमधील टेक्सास येथील ट्रिंबल टेक हायस्कूलमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहे.