मराठी अभिनेत्रीच्या लेकाचा पहिला वाढदिवस, शेअर केली भावुक पोस्ट; फोटोंनी वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:48 IST2026-02-10T15:48:01+5:302026-02-10T15:48:31+5:30

अभिनेत्रीला ओळखलंत का?

marathi actress neha gadre celebrated son ivaan bapat s first birthday shared emotional post | मराठी अभिनेत्रीच्या लेकाचा पहिला वाढदिवस, शेअर केली भावुक पोस्ट; फोटोंनी वेधलं लक्ष

मराठी अभिनेत्रीच्या लेकाचा पहिला वाढदिवस, शेअर केली भावुक पोस्ट; फोटोंनी वेधलं लक्ष

'मन उधाण वाऱ्याचे' या लोकप्रिय मालिकेत दिसलेली मराठी अभिनेत्री नेहा गद्रे आठवतेय का? मोजके प्रोजेक्ट केल्यानंतर नेहाने ईशान बापटशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. गेल्या वर्षी नेहाने ऑस्ट्रेलियातच गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव इवान असं ठेवण्यात आलं. आज छोटा इवान एक वर्षाचा झाला. लेकासाठी नेहा गद्रेने भावुक पोस्ट केली आहे.

माझा लाडका इवान, आज तू एक वर्षाचा झालास आणि माझं मन भावनांनी भरून आलं आहे जे मी शब्दांत मांडू शकत नाही. असं वाटतंय की कालच मी तुला पहिल्यांदा हातात घेतलं होतं—ती भीती, ते भावूक होणं आणि  प्रेम अजूनही तेवढंच आहे. मागचं वर्ष माझ्यासाठी सर्वात सुंदर होतं. रात्री जागणं, तुझं ते मला बिलगणं, तुझं पहिलं हसू आणि तुझे प्रत्येक छोटे माइलस्टोन  पाहून मी आणखी भावुक होत होते.  तू मला अधिक खंबीर, अधिक संयमी आणि अधिक प्रेमळ बनवलंस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू मला 'आई' बनवलंस. तुला दिवसागणिक मोठं होताना पाहणं, तुझं ते पहिलं हसू, तुझी ती छोटी बोटे ज्यांनी माझं बोट पकडलं होतं, आणि तुझा तो निरागस आवाज ज्याने आपलं घर भरून गेलं—हा माझ्या आयुष्यातील सर्वात जादुई प्रवास आहे.

तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, स्वीटहार्ट! तुझे आयुष्य नेहमी आनंद, हास्य आणि अमाप प्रेमाने भरलेले राहो. तू कितीही मोठा झालास किंवा आयुष्यात कितीही लांब गेलास, तरी नेहमी लक्षात ठेव की मी तुझी आई कायम तुझी सुरक्षित जागा असेल. तू नेहमीच माझं लहान बाळ, माझा सर्वात मोठा आनंद आणि माझ्या हृदयाचा सर्वात सुंदर भाग असशील."


नेहा महिनाभरापूर्वीच भारतात परतली होती. इथे येऊन तिने इवानचं बोरन्हाण केलं. नवरा आणि मुलासोबत ती पुण्यात फिरली. तसंच ती असताना 'अजूनही चांदरात आहे' या तिच्या मालिकेचं रियूनियनही झालं. इतकंच नाही तर तिने नुकत्याच रिलीज झालेल्या 'अगं अगं सूूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या केदार शिंदेंच्या सिनेमात कॅमिओही केला. नेहा आता पुन्हा ऑस्ट्रेलियाला गेली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असते. लेकासोबतच्या तिच्या फोटो, व्हिडीओंना लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होतो. 

Web Title : मराठी अभिनेत्री नेहा गड्रे के बेटे का पहला जन्मदिन, भावुक पोस्ट शेयर की

Web Summary : ‘मन उधाण वाऱ्याचे’ फेम नेहा गड्रे ने ऑस्ट्रेलिया में अपने बेटे इवान का पहला जन्मदिन मनाया। उन्होंने प्यार और खुशी व्यक्त करते हुए एक भावुक पोस्ट साझा की। नेहा हाल ही में भारत आई थीं, पुनर्मिलन में भाग लिया और ऑस्ट्रेलिया लौटने से पहले एक फिल्म में कैमियो किया।

Web Title : Marathi Actress Neha Gadre's Son Turns One, Shares Emotional Post

Web Summary : Neha Gadre, known for 'Man Udhaan Varyache,' celebrated her son Evan's first birthday in Australia. She shared a heartfelt post expressing her love and joy. Neha recently visited India, participated in reunions, and made a cameo in a film before returning to Australia.