मुक्तावर होतोय प्रेमाचा वर्षाव; 'Y' साठी अभिनेत्रीला मिळतोय पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 18:00 IST2022-06-26T17:59:56+5:302022-06-26T18:00:32+5:30

Mukta barve: पुण्यातील एका शो दरम्यान महिला प्रेक्षकवर्गाने मुक्ताला पाठिंबा दिला आहे. मुक्ताचा अभिनय विशेष पसंतीत पडल्यामुळे अनेकांनी तिची पाठ थोपटली आहे.

marathi actress mukta barve Y movie women support actress | मुक्तावर होतोय प्रेमाचा वर्षाव; 'Y' साठी अभिनेत्रीला मिळतोय पाठिंबा

मुक्तावर होतोय प्रेमाचा वर्षाव; 'Y' साठी अभिनेत्रीला मिळतोय पाठिंबा

काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय' हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे उत्तम कथानक आणि मुक्ता वर्बेचा  (mukta barve) अभिनय यामुळे हा चित्रपट सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे. यामध्येच पुण्यातील एका शो दरम्यान महिला प्रेक्षकवर्गाने मुक्ताला पाठिंबा दिला आहे. मुक्ताचा अभिनय विशेष पसंतीत पडल्यामुळे अनेकांनी तिची पाठ थोपटली आहे. तसंच महिलांनी दिलेल्या या पाठिंब्यामुळे 'वाय'चा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याचा जणू एक संकेत मिळाला आहे. 

" समाजात घडणाऱ्या एका ज्वलंत विषयवार भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि अशा घटना आपल्या आजूबाजूला सर्रास घडत असतात. मात्र, आपण त्यापासून अनभिज्ञ असतो किंवा मग आपण त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतो. त्यामुळे या घटना समाजापर्यंत पोहोचाव्यात म्हणून हा विषय आम्ही प्रेक्षकांपर्यंत आणला आहे. प्रेक्षकांकडून, सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून, समीक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रया पाहून हा चित्रपट अनेकांपर्यंत पोहोचला असून चित्रपटाच्या विषयांचे गांभीर्य लोकांच्या लक्षात येत आहे आणि हीच आमच्या कामाची पोचपावती आहे असं मी समजते, असं मुक्ता म्हणाली.

दरम्यान,  कन्ट्रोल एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केलं आहे. या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक, रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 

Web Title: marathi actress mukta barve Y movie women support actress