झी महागौरव पुरस्कार सोहळा: 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 17:35 IST2022-03-21T17:34:49+5:302022-03-21T17:35:14+5:30

Mukta Barve: तिच्या कार्याची दखल घेत यंदाच्या झी महागौरव पुरस्कार सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आलं आहे.

marathi actress mukta barve received the award | झी महागौरव पुरस्कार सोहळा: 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

झी महागौरव पुरस्कार सोहळा: 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

मराठी कलाविश्वातील सर्वात गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून कायम मुक्ता बर्वेकडे (Mukta Barve) पाहिलं जातं. 'जोगवा', 'आम्ही दोघी' अशा कितीतरी चित्रपट, मालिकांमधून मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळेच तिच्या कार्याची दखल घेत यंदाच्या झी महागौरव पुरस्कार सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आलं आहे.

'जोगवा' या चित्रपटासाठी मुक्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. "झी महागौरवचा पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप छान वाटलं. तो दिवसच खूप छान होता. मला ती संकल्पनाच खूप आवडली. झी गौरवच एकविसावं वर्ष. माझ्या करिअरला आता २० वर्ष झालं. तसेच करिष्मा कपूरच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा पण आनंद आहे", असं मुक्ता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "पुरस्कार मिळाल्यानंतर मी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यावर फॅन्सनी खूप कौतुक केलं. काहींनी कौतुक करताना 'निर्विवाद होतं' अशी कमेंट देखील केली. पण मला स्वतःला निर्विवाद वाटत नाही. कारण अनेक अभिनेत्रींनी उत्तम कामं केली. २१ वर्षात ज्या अभिनेत्रींना पुरस्कार मिळाले त्या उत्तमच आहेत. त्यामुळे माझी पुरस्कारासाठी निवड होणं निर्विवाद होतं असं मी म्हणणार नाही पण माझी निवड झाली याचा मला प्रचंड आनंद आहे."

Web Title: marathi actress mukta barve received the award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.