'या' कारणामुळे मिथिला पालकर करत नाही मराठी इंडस्ट्रीत काम; 'मुरांबा' होता अखेरचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 02:54 PM2023-11-14T14:54:55+5:302023-11-14T14:56:18+5:30

Mithila palkar: मिथिलाने मराठी सिनेमात काम न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

marathi actress mithila-palkar-talks-about-selection-of-roles | 'या' कारणामुळे मिथिला पालकर करत नाही मराठी इंडस्ट्रीत काम; 'मुरांबा' होता अखेरचा सिनेमा

'या' कारणामुळे मिथिला पालकर करत नाही मराठी इंडस्ट्रीत काम; 'मुरांबा' होता अखेरचा सिनेमा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर (Mithila Palkar). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर मिथिलाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. सिनेमा, मालिकांपेक्षा मिथिला वेबसीरिजमध्ये जास्त रमताना दिसते. त्यामुळे ती फार मोजक्या सिनेमांमध्ये झळकली आहे. इतकंच नाही तर मुरांबा या सिनेमानंतर ती मराठीत पुन्हा झळकली नाही. त्यामुळे मिथिला मराठीत काम का करत नाही? असे अनेक प्रश्न तिला विचारले जातात. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये तिने मराठीत काम न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

"मुरांबा हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या सिनेमानंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण, मला काही विषय पटले नाहीत. तर,काही रुचले नाहीत. काही सिनेमा, हाती अन्य प्रोजेक्ट्स असल्यामुळे करता आले नाहीत", असं मिथिला म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मला जेव्हा एखादी भूमिका पटते तेव्हाच मी ती करते. त्यात प्रेक्षकांचीही साथ मिळते. ते मला सांभाळूनही घेतात. समोरच्याला आनंद होईल की नाही किंवा कोणाचं मन सांभाळायचं म्हणून भूमिका स्वीकारत नाही. जेव्हा मला ते पात्र पटते, तेव्हाच मी त्या चित्रपटात काम करण्यासाठी होकार देते."

दरम्यान, मिथिला पालकरने २०१४ साली माझं हनिमून नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये पहिल्यांदा काम केले होते. ही फिल्म १६ व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली गेली. जून २०१४ मध्ये तिला कट्टी बट्टी हा चित्रपट मिळाला. नंतर तिने वेब सीरिज, मराठी, हिंदी सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

Web Title: marathi actress mithila-palkar-talks-about-selection-of-roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.