ट्रेनने जायचं म्हणत विमानाने गोव्याला घेऊन गेली, मराठी अभिनेत्रीने ७५व्या वाढदिवशी आईला दिलं खास सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 12:20 IST2024-10-13T12:19:43+5:302024-10-13T12:20:06+5:30

मराठी अभिनेत्रीने आईला दिलं खास सरप्राइज, ७५व्या वाढदिवशी घडवून आणला विमानप्रवास, म्हणते- "विमानात बसल्यावर..."

marathi actress megha ghadge surprised her mom on 75th birthday with plane journey | ट्रेनने जायचं म्हणत विमानाने गोव्याला घेऊन गेली, मराठी अभिनेत्रीने ७५व्या वाढदिवशी आईला दिलं खास सरप्राइज

ट्रेनने जायचं म्हणत विमानाने गोव्याला घेऊन गेली, मराठी अभिनेत्रीने ७५व्या वाढदिवशी आईला दिलं खास सरप्राइज

मेघा घाडगे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच मेघा एक उत्तम लावणी नृत्यांगणादेखील आहे. अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. लावणीच्या दिलखेचक अदांनी मेघा चाहत्यांना घायाळ करत असते. मेघाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतंच मेघाने तिच्या आईला वाढदिवसानिमित्त खास सरप्राइज दिलं आहे. 

मेघाच्या आईचा ७५वा वाढदिवस आहे. यानिमित्त मेघाने तिच्या आईला सरप्राइज देत विमानप्रवास घडवून आणला आहे. ट्रेनने गोव्याला जायचं सांगून मेघा तिच्या आईला थेट एअरपोर्टवर घेऊन आली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओ मेघा तिची आई आणि कुटुंबीयासोबत सांताक्रुझ एअरपोर्टवर दिसत आहे. पहिल्यांदा विमानात बसल्यानंतर तिच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे. 


"आईचा 75वा वाढदिवस ..!! पहिल्यांदा विमानाने प्रवास केला . अचानक प्लॅन ठरला आणि सगळेच निघालो . “अगं नवीन अंडरग्राऊंड ट्रेन सुरू झालीय सांगून एअरपोर्टला आणलं. विमानात बसल्यावर तिच्या चेहऱ्याचा आनंद आमच्यासाठी आणि तिच्या नातवांसाठी अविस्मरणीय राहील. love you आई ..!!", असं म्हणत मेघाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

मेघा घाडगे लावणी डान्सर म्हणून लोकप्रिय आहे. गेल्या २० वर्षांपासून ती लावणी नृत्य करत आहे. तिने 2004 साली आलेल्या 'पछाडलेला' या गाजलेल्या मराठी सिनेमातून पदार्पण केलं होतं. काही मराठी सिनेमांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. बिग बॉस मराठी 4मध्येही ती सहभागी झाली होती.
 

Web Title: marathi actress megha ghadge surprised her mom on 75th birthday with plane journey