नेहा पेंडसेनंतर आता मराठीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्नबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 19:33 IST2020-02-04T19:30:29+5:302020-02-04T19:33:29+5:30
या अभिनेत्रीनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.

नेहा पेंडसेनंतर आता मराठीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्नबंधनात
काहीच महिन्यांपूर्वी नेहा पेंडसेने गाजतवाजत लग्न केले. तिच्या लग्नाची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. आता तिच्यानंतर आणखी एक मराठी अभिनेत्री लग्नबंधनात अडकली असून या अभिनेत्रीनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.
आपल्या लावणीने रसिकांवर भुरळ घालणाऱ्या मेघा घाडगेचे नुकतेच लग्न झाले असून तिनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. पण तिचे पती कोण आहेत, तसेच तिने केव्हा लग्न केले या सगळ्या गोष्टींबाबत तिने मौन राखणेच पसंत केले आहे. मेघाने लग्न केले असल्याची पोस्ट फेसबुकला टाकल्यानंतर तिचे फॅन्स तिचे अभिनंदन करत असून तिच्या भावी जीवनासाठी तिला शुभेच्छा देत आहेत. तिने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लावणी नृत्यात पारंगत असलेल्या मेघाने आजवर अनेक मराठी चित्रपटात आपली लावणी रसिकांसमोर सादर केली आहे. पछाडलेला, पोपट, माहेरची माया, चल धर पकड यांसारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे. तसेच एकापेक्षा एक अप्सरा आली या झी मराठीवरील प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोमधील तिच्या डान्सची चांगलीच चर्चा झाली होती. या कार्यक्रमातील तिची अदा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. मेघ मल्हार नावाने ती डान्स क्लास चालवत असून त्यात ती नृत्याची धडे देते.