मराठीतील या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का ?, सोशल मीडियावर आहे तिचा बोलबाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 13:21 IST2020-03-26T13:16:23+5:302020-03-26T13:21:30+5:30
सोशल मीडियावर ती आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते.

मराठीतील या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का ?, सोशल मीडियावर आहे तिचा बोलबाला
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री मीरा सारंग सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. मीरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते.
तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. मीराने इन्स्टाग्रामवर साडीतले फोटोशूट शेअर केला आहे.
या फोटोंमध्ये मीरा खूपच सुंदर दिसते आहे. तिचं हे फोटोशूट पाहून कुणीही घायाळ होईल. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मुळाची पुण्याची असलेल्या मीराने जागे मोहन प्यारेमध्ये माधुरी, सोनी मराठीवरील दुनियादारी फिल्मी आणि कर्लस टीव्हीवरील श्री लक्ष्मी नारायण या मालिकेंमध्ये काम केले आहे.