lokmat most stylish awards: रेड कार्पेटवर मयुरी देशमुखचा जलवा; स्पेशल लूकची होतीये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 22:08 IST2023-09-12T21:47:28+5:302023-09-12T22:08:45+5:30
Mayuri Deshmukh: मयुरीच्या लूकने चाहते घायाळ

lokmat most stylish awards: रेड कार्पेटवर मयुरी देशमुखचा जलवा; स्पेशल लूकची होतीये चर्चा
'खुलता कळी ही खुलेना' या गाजलेल्या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh). नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून मयुरीने तिच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. इतकंच नाही तर तिने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली. त्यामुळे मयुरी आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी मालिकांमधून सुरु केलेला मयुरीचा प्रवास हिंदी मालिकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे तिची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. नुकतीच मयुरीने lokmat most stylish awards या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली असून तिच्या ग्लॅमरस लूकने तिने पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.
कलाविश्वासह सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मयुरीच्या ग्लॅमरस आणि हटके लूकची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे कोणताही आऊटफिट ती उत्तमरित्या कॅरी करते. यायचा प्रत्यय नुकताच लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात आला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये मयुरीने गोल्डन रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. या आऊटफिटला साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईलही तिने केली होती. विशेष म्हणजे तिच्या या हटके ग्लॅमरस लूकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान,खुलता कळी खुलेना, डिअर आजोबा, लग्नकल्लोळ यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिका, नाटक, सिनेमांमध्ये काम केलं आहे.