घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा प्रेमात? Valentines week मध्ये 'या' व्यक्तीसोबत फिरतेय; इन्स्टा स्टोरीतून मिळाली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 16:58 IST2024-02-11T16:55:40+5:302024-02-11T16:58:10+5:30

 सध्या मानसी विदेशात व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिथले फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Marathi actress Mansi Naik was spotted hanging out with this guy during Valentine's week | घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा प्रेमात? Valentines week मध्ये 'या' व्यक्तीसोबत फिरतेय; इन्स्टा स्टोरीतून मिळाली हिंट

घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा प्रेमात? Valentines week मध्ये या व्यक्तीसोबत फिरतेय

सध्या सगळीकडे प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक Valentine's Week 2023 सुरु आहे. प्रेमात अगदी आकंठ बुडालेले लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहात असतात. Valentines week मध्ये अनेक सेलिब्रेटींनी आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. तर काहींनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. पण, सध्या चर्चा आहे ती अभिनेत्री मानसी नाईकची. मानसीच्या एक पोस्टनं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे मानसी खरचं पुन्हा प्रेमात पडली आहे का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. 

 सध्या मानसी विदेशात व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिथले फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मानसीने शेअर केलेल्या फोटोत ती एकटीच दिसते आहे. त्यामुळे सध्या ती स्पेनमध्ये कोणासोबत फिरते आहे, हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण, तिच्या इन्स्टास्टोरीतून एका तरुणाचं नाव समोर येत आहे. त्याचं नाव राहुल असं आहे. त्याने आपल्या इन्स्टावर मानसीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे आता ते दोघे एकत्र फिरत असल्याचे समोर आलं आहे. 

तसेच नुकताच मानसी नाईकचा वाढदिवसही झाला. पण, यंदाचा वाढदिवसही तिनं पॅरिसमध्ये साजरा केला. यावेळीही राहुलनं इस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत मानसीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. यामुळे मानसीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीनं एन्ट्री घेतली असल्याचं चाहते म्हणत आहेत.  दरम्यान मानसी नाईकने १९ जानेवारी २०२१ साली प्रदीप खरेराशी लग्नगाठ बांधली होती. परंतु, नंतर वाद झाल्याने त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आपलं लग्न हा एक शाप होता, असही ती म्हणाली होती. 

मानसी नाईकने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. 'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे तिलाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. तसेच मानसीचे 'आयटम साँग' हिट ठरलेत. 'बाई वाड्यावर या', मस्त चाललंल आमचं' या गाण्यांमुळे मानसी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.  सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. 

Web Title: Marathi actress Mansi Naik was spotted hanging out with this guy during Valentine's week