Video: तरुणींनाही लाजवतायेत किशोरी शहाणे; नऊवारी साडीतील त्यांचा हा डान्स एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 19:50 IST2022-04-11T19:48:59+5:302022-04-11T19:50:55+5:30
Kishori shahane: अलिकडे किशोरी शहाणे यांनी त्यांच्या मालिकेच्या सेटवरुन एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

Video: तरुणींनाही लाजवतायेत किशोरी शहाणे; नऊवारी साडीतील त्यांचा हा डान्स एकदा पाहाच
'सगळीकडे बोंबाबोंब', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'दुर्गा झाली गौरी', 'मोरुची मावशी' अशा कितीतरी चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. उत्तम अभिनयाच्या जोरावर किशोरी यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवली. त्यामुळे आजही त्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनच ओळखल्या जातात. काही काळापूर्वी त्या बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा मोर्चा हिंदी मालिकांकडे वळवला आहे.
किशोरी शहाणे कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय असून अनेकदा त्या त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यात खासकरुन त्या सेटवरील त्यांचे डान्स व्हिडीओ शेअर करत असल्याचं पाहायला मिळतं. यावेळीदेखील त्यांनी असाच एक डान्स व्हिडीओ शेअर केला असून त्यात त्या शास्त्रीय नृत्य करताना दिसत आहेत.
अलिकडे किशोरी शहाणे यांनी त्यांच्या मालिकेच्या सेटवरुन एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या शास्त्रीय नृत्य करत असून त्यांचं नृत्यकौशल्य पाहून भल्याभल्या अभिनेत्री त्यांच्यासमोर फिक्या पडतील. विशेष म्हणजे त्यांचा डान्स पाहिल्यावर त्यांच्या वयाचाही अंदाज लावता येत नाही इतक्या छान पद्धतीने त्या डान्स करतात.