"मला टेन्शन आलेलं...", ‘टाईमपास’ सिनेमानंतर केतकी माटेगावकरला यायचे लग्नाचे प्रस्ताव, म्हणाली-"४ ते ५ वर्ष…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:50 IST2026-01-02T13:46:32+5:302026-01-02T13:50:57+5:30
‘टाईमपास’ सिनेमानंतर केतकी माटेगावकरला फेसबुकवर यायचे चाहत्यांच्या लग्नाचे प्रस्ताव, म्हणाली...

"मला टेन्शन आलेलं...", ‘टाईमपास’ सिनेमानंतर केतकी माटेगावकरला यायचे लग्नाचे प्रस्ताव, म्हणाली-"४ ते ५ वर्ष…"
Ketki Mategaonkar: रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास ११ वर्ष उलटली आहेत. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं.टाईमपास सिनेमातील डायलॉग्ज आणि गाण्यांची सुद्धा प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली होती. ‘टाईमपास’ म्हणून सुरु झालेली ‘दगडू’ आणि ‘प्राजक्ता’ची हळुवार प्रेमकथा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केतकीने टाईमपास चित्रपटानंतर तिला आलेल्या अनुभवांविषयी सांगितलं.
नुकतीच 'टाईमपास' चित्रपटाच्या टीमने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या निमित्तानं चित्रपटाच्या टीमचं रियुनिअन झालेलं पाहायला मिळालं. यावेळी केतकीने वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. दरम्यान, तिने टाईमपास सिनेमा केल्यानंतर तिला आलेले अनुभव शेअर केले. तेव्हा केतकी म्हणाली, "चित्रपटातील कुठलेच सीन मला अनकम्फर्टेबल वाटतील असे नव्हते. म्हणजे सर प्रत्येक सीन आम्हाला खूप छान पद्धतीने समजावून सांगायचे. मुळात मी व्यक्ती म्हणूनच खूप लाजाळू होते. मला एखादी गोष्ट हवी असेल तर त्या गोष्टीसाठी मी दहा वेळा विचार करायचे. त्यामुळे तो लाजाळूपणा सगळीकडे दिसायचा. "
मुलांच्या नावाच्या पत्रिका यायच्या...
मग पुढे केतकी म्हणाली,"आता मी त्या स्वभावाच्या विरुद्ध बनले आहे. टाईमपास नंतर मी पूर्णपणे बदलले.रवी सरांना माहिती आहे की मी पुण्यात सुद्धा कुठल्याही क्लासला जाताना मला माझे बाबा सोडायला यायचे. टाईमपास सिनेमा हेच त्याचं कारण होतं. मला चि.सौ. का केतकी..., आमचा अमुक एक चिरंजीव... अशा त्या मुलांच्या नावाच्या पत्रिका फेसबुक मेसेंजरला पाठवल्या होत्या. 'मी तुझ्यासाठी आयटी प्रोफेशनमध्ये जातोय, मी आता शिकतोय आणि तुझ्या आई-बाबांकडे तुझा हात मागायला येणार आहे.' एका पॉइंटला तर मला टेन्शनच आलं होतं कारण, बाबाला असे मेसेज यायचे. 'आम्हाला माहिती आहे की केतकी या वेळेला, या ठिकाणी क्लासला जाते. तिला या ठिकाणचं हॉट चॉकलेट खायला आवडतं.' यामुळे बाबाला टेन्शन यायला लागलं. टाईमपास रिलीज झाल्यानंतर ४ ते ५ वर्ष हे असंच चालू होतं. आजही अशा गोष्टी घडतात."