'क्वारांटाईन लाईफ' असा हॅशटॅग देत मराठी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 13:04 IST2020-04-23T12:53:02+5:302020-04-23T13:04:30+5:30
अभिनेत्री ह्रता दुर्गुळे सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.

'क्वारांटाईन लाईफ' असा हॅशटॅग देत मराठी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने शेअर केला फोटो
कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. सगळे सेलिब्रेटी घरातच क्वारांटाईन झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फॅन्सच्या संपर्कात असतात. अभिनेत्री ह्रता दुर्गुळे सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. मालिका आणि नाटक विश्वातील तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर ह्रता दुर्गुळे वेगळं स्थान निर्माण केले आहे .ह्रताने तिचे एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोत ह्रता विचारात बसलेली दिसतेय. क्वारांटाईन लाईफ अशी टॅगलाईन या फोटोला ह्रताने दिली आहे.. आतापर्यंत या फोटोला 1 लाखहुन अधिक लाईक्स आले आहेत.
छोटा पडदा गाजवल्यानंतर 'अनन्या' सिनेमाद्वारे ऋता या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.अनन्या हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचे टीजर पोस्टर आऊट झाले आहे. या पोस्टवर अतिशय लक्षवेधी आणि सूचक आहे. मोकळ्या आणि अथांग आकाशाकडे पाहात पक्षाप्रमाणे झेप घेऊ पाहाणारी तरुणी या पोस्टरवर दिसत आहे.
त्यामुळे स्त्री केंद्रित, प्रेरणादायी आणि आशयसंपन्न कथानक या सिनेमातून मांडलं जाणार असल्यानं हा सिनेमा नक्कीच महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही. लेखक दिग्दर्शक रवी जाधवने या सिनेमाची निर्मिती केली आहे. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवल्यानंतर अनन्या ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे.