सई, सोनालीपाठोपाठ हृता दुर्गुळेनेही घेतलं नवीन घर, फोटो शेअर करत म्हणाली,...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 12:37 IST2023-12-03T12:36:58+5:302023-12-03T12:37:22+5:30

सध्या अनेक मराठी कलाकार एकामागोमाग एक नवीन घराची बातमी देत आहेत.

marathi actress Hruta Durgule also bought new home with husband prateek shah | सई, सोनालीपाठोपाठ हृता दुर्गुळेनेही घेतलं नवीन घर, फोटो शेअर करत म्हणाली,...

सई, सोनालीपाठोपाठ हृता दुर्गुळेनेही घेतलं नवीन घर, फोटो शेअर करत म्हणाली,...

सध्या अनेक मराठी कलाकार एकामागोमाग एक नवीन घराची बातमी देत आहेत. कोणाला म्हाडाच्या घराची लॉटरी लागली आहे तर कोणी स्वत:चे घर खरेदी केले आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवेने मध्यंतरी नवीन घराची झलक दाखवत पोस्ट शेअर केली होती. तर सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांनीही नवीन घर घेतल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता आणखी एक मराठी अभिनेत्री नवीन घरात शिफ्ट होत आहे. ती म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). 

हृता दुर्गुळे आणि तिचा पती प्रतीक शाह दोघांनी नवीन घर घेतल्याची बातमी नुकतीच शेअर केली. हृताने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने आणि प्रतीकने एकमेकांच्या डोक्याला डोकं लावत रोमँटिक पोज दिली आहे. तसंच नवीन घर, आम्ही करुन दाखवलं असे हॅशटॅगही तिने दिले आहेत. 'वॉल्स अँड बीम्स, लव्ह अँड ड्रीम्स..जादुई नवी सुरुवात' असं कॅप्शनही तिने दिलं आहे.'

हृताच्या पोस्टवर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मे २०२२ मध्ये हृताने प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली. प्रतीक हिंदी मालिकांचा निर्माता आहे. तसंच त्याची आईही अभिनेत्री आहे. दोघंही सध्या सुखी संसार जगत असून नुकतंच नवीन घरात शिफ्ट झाले आहेत.

 

Web Title: marathi actress Hruta Durgule also bought new home with husband prateek shah