'माझ्या आयुष्यात 'तमाशा Live' याच दिवशी सुरू झाला'; bai bubs and bra अन् नव्या सिनेमाची सांगड घालणारी हेमांगीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 10:20 AM2022-07-15T10:20:40+5:302022-07-15T10:21:51+5:30

Hemangi kavi: हेमांगीने सोशल मीडियावर व्यक्त होत तिच्या 'तमाशा Live' या चित्रपटाविषयी आणि 'बाई बुब्स आणि ब्रा' या प्रकरणाची सांगड घालत या वर्षभरात तिच्यासोबत कोणकोणत्या घटना घडल्या हे सांगितलं आहे.

marathi actress hemangi kavi bai bubs and bra post one year complete share special post | 'माझ्या आयुष्यात 'तमाशा Live' याच दिवशी सुरू झाला'; bai bubs and bra अन् नव्या सिनेमाची सांगड घालणारी हेमांगीची पोस्ट चर्चेत

'माझ्या आयुष्यात 'तमाशा Live' याच दिवशी सुरू झाला'; bai bubs and bra अन् नव्या सिनेमाची सांगड घालणारी हेमांगीची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

बेधडक आणि बिंधास्तपणे व्यक्त होणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi). उत्तम अभिनयासह हेमांगी कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. कलाविश्व असो वा समाजातील एखादी घटना हेमांगी उघडपणे त्यावर आपलं मत मांडत असते. मागच्या वर्षी तिचं 'बाई बुब्स आणि ब्रा' हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालं असून तिने त्याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे आज तिचा 'तमाशा Live' (Tamasha Live)हा नवा कोरा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या दोन घटनांचा योग साधत तिने तिचं मत मांडलं आहे.

हेमांगीने सोशल मीडियावर व्यक्त होत तिच्या 'तमाशा Live' या चित्रपटाविषयी आणि 'बाई बुब्स आणि ब्रा' या प्रकरणाची सांगड घालत या वर्षभरात तिच्यासोबत कोणकोणत्या घटना घडल्या. कशा प्रकारचे अनुभव तिला आले हे सांगितलं आहे.

काय आहे हेमांगीची पोस्ट?

"माझ्या आयुष्यातला 'तमाशा Live'. माझ्या खूप viral झालेल्या 'बाई, बुब्स आणि ब्रा' post ला आज वर्ष पूर्ण होतंय. And I am very proud of it.  काही लोकं आजही त्याची खिल्ली उडवत मला आठवण करून देतायेत. Tag करतायेत. ते खिल्ली उडवणारच कारण त्यांना त्यातलं गांभीर्य कळलं नाही आणि ते कधी कळणारही नाही किंवा त्यांना मुद्दाम कळून घ्यायचं नाही. पण अनेक लोक या trollers एवढेच किंबहुना जास्तच म्हणेन मी खूप sensible, sensitive लोक माझ्या support ला आले आणि माझ्याशी जोडले गेले. खूप मुलींच्या, स्त्रियांच्या मनातल्या कुचंबनेला वाच्या फुटली. माझ्यासाठी हेच महत्वाचं होतं कारण माझा हेतूच तो होता. काही तरी वादग्रस्त, sensational बोलून मला कुठलीही publicity stunt वगैरे करायचा नव्हता. मला माझ्या देशाने व्यक्त व्हायचा अधिकारी दिलाय आणि मला ज्या गोष्टीचा समाजात वावरताना जर त्रास होत असेल तर तो मी बोलून दाखवणार. तसाच व्यक्त व्हायचा अधिकार काही trollers ने घेतला आणि वाट्टेल ते थराला जाऊन troll केलं. अजूनही करतात", असं हेमांगी म्हणाली.


 

पुढे ती म्हणते, "ते बरोबर की चूक, योग्य की अयोग्य मला माहीत नाही. बस समाज आणि माणूस म्हणून आपण कोण आहोत याची ओळख झाली.  मित्र परिवाराने साथ सोडली, काहींनी unfollow केलं, distance तयार केला. अनेक हितचिंतकांचे calls आले. काही support करणारे तर काही भीती दाखवणारे. 'आता तुझं career धोक्यात येणार, तुला कुणीही काम देणार नाही, तूझी image आता दूषित झाली, प्रेक्षक तुला कधीच स्वीकारणार नाहीत वगैरे वगैरे! मला त्यांना एवढंच सांगायचंय प्रेक्षक म्हणून तुम्ही माझं career हिरावून घेऊ शकता माझं जगणं नाही!  मी त्यांच्या या बोलण्यामुळे घाबरले नाही पण वाईट नक्कीच वाटलं होतं. मनात आलं खरंच असं घडलं तर आपण दुसरा मार्ग धरू. दुसरं काहीतरी चांगलं काम करू. पण तसं काही करायची वेळ आली नाही कारण जुलै महिन्याच्या शेवटाला संजय दादांचा 'तमाशा Live' साठी call आला आणि दीड दोन महिन्यांचं work shop करून सिनेमा shoot सुद्धा केला आणि आज तो प्रदर्शित होतोय! दादा, या सगळ्या घटनेनंतर ही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात! लोकांनी दाखवलेली भीती खोटी ठरवलीत यासाठी मी कायम ऋणी राहीन! हा सिनेमा तर माझ्यासाठी महत्वाचा आहेच पण मला माझ्यातला आत्मविश्वास जागवण्याची संधी दिलीत त्यासाठी खूप खूप ❤️. मागच्या वर्षी 'बाई, बुब्स आणि ब्रा' मुळे मी breaking news च्या भोवऱ्यात आले होते आज 'तमाशा Live' मुळे बातम्यांच्या वलयात आहे.  माझ्या post ची anniversary मी अश्या पद्धतीने celebrate करेन वाटलं नव्हतं!  आज चित्रपट प्रदर्शित होतोय खरा पण माझ्या आयुष्यात माझा 'तमाशा Live' मागच्या वर्षी याच दिवशी सुरू झाला होता! ".

नेमकं काय आहे हेमांगीचं बाई बुब्स आणि ब्रा प्रकरण?

गेल्यावर्षी हेमांगीने सोशल मीडियावर पोळ्या करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये पोळ्या करणाऱ्या हेमांगीने अंर्तवस्त्र परिधान न केल्याचं काही जणांनी म्हटलं होतं. इतकंच नाही तर अनेकांनी तिला ट्रोलही केलं होतं. याप्रकरणी तिने स्टँड घेत ट्रोलर्सला सडेतोड उत्तरंही दिलं. त्यामुळे तिचं हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

दरम्यान, या प्रकरणाची आणि तिच्या 'तमाशा Live' या चित्रपटाची रिलीज डेट एकच आल्यामुळे तिने ही पोस्ट शेअर केली. 'तमाशा Live' या चित्रपटात हेमांगीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात हेमांगीसह सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव आणि सचित पाटील ही कलाकार मंडळी झळकली आहेत.

Web Title: marathi actress hemangi kavi bai bubs and bra post one year complete share special post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.