फोटोतील ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? शाहरुख आणि आमिर खानबरोबर केलं आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 17:48 IST2023-09-12T17:47:19+5:302023-09-12T17:48:17+5:30

शाहरुखच्या 'जवान'मध्ये झळकली आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?

marathi actress girija oak shared shah rukh khan jawan movie first look test photo | फोटोतील ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? शाहरुख आणि आमिर खानबरोबर केलं आहे काम

फोटोतील ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? शाहरुख आणि आमिर खानबरोबर केलं आहे काम

‘जवान’ या बॉलिवूड चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. जिकडेतिकडे फक्त शाहरुख खानच्या ‘जवान’चाच बोलबाला आहे. तगडी स्टारकास्ट आणि उत्तम कथा असलेल्या ‘जवान’ने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. या चित्रपटाच्या टीझरपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. शाहरुखच्या ट्रेलरमध्ये मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकची झलक पाहिल्यानंतर चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. आता गिरीजाने तिच्या फर्स्ट लूकचा फोटो शेअर केला आहे.

गिरीजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जवानच्या पहिल्या लूक टेस्टचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये गिरीजाने हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले असून हातात बंदूक घेतल्याचं दिसत आहे. ‘जवानसाठी पहिली लूक टेस्ट’ असं कॅप्शन गिरीजाने या फोटोला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर सेलिब्रिटींबरोबरच चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. ‘जवान’ चित्रपटात गिरीजाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर सहा मुलींची कथा दाखविण्यात आली आहे. या सहा मुलींपैकी एकीची भूमिका गिरीजाने साकारली आहे.

‘जवान’ आधी गिरीजा आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या बॉलिवूड चित्रपटात झळकली होती. ‘जवान’नंतर ती विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गिरीजाने अनेक हिंदी जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अवघ्या चारच दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत आहे. किंग खानबरोबर नयनतारा, विजय सेतुपथी, सान्या मल्होत्रा, दीपिका पदुकोण, सुनिल ग्रोव्हर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: marathi actress girija oak shared shah rukh khan jawan movie first look test photo