मुंबईतील हुत्माता चौकाजवळ व्हिडीओ शूट केल्याने मराठी अभिनेत्री होतेय ट्रोल; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 15:14 IST2026-03-01T15:13:09+5:302026-03-01T15:14:03+5:30

रिल्सची हौस भारी पडली! मुंबईतील हुत्माता चौकाजवळ मराठी अभिनेत्रीने शूट केला व्हिडीओ, नेटकऱी संतापले

marathi actress gauri nalawade gets trolled for shooting a video near hutmata chowk in mumbai netizens says | मुंबईतील हुत्माता चौकाजवळ व्हिडीओ शूट केल्याने मराठी अभिनेत्री होतेय ट्रोल; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

मुंबईतील हुत्माता चौकाजवळ व्हिडीओ शूट केल्याने मराठी अभिनेत्री होतेय ट्रोल; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

Marathi Actress Viral Video: हल्ली सोशल मिडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. सर्वसामान्यांसह अगदी कलाकार मंडळी देखील यावर आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत लाइमलाईटमध्ये येत असतात. पण, हे फोटो , व्हिडीओ व्हायरल होऊन कधी काय होईल याचा नेम नाही. या व्हायरल व्हिडीओमुळे अनेकदा अडचणींचा देखील सामना करावा लागतो. असंच काहीसं एका अभिनेत्रीसोबत घडलं आहे. मराठीतील या लोकप्रिय अभिनेत्रीचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

दरम्यान, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून गौरी नलावडे आहे. सध्या गौरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री एका तपकिरी रंगाचा ब्लेझर आणि पॅन्ट अशा  आऊटफिटमध्ये दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ मुंबईतील हुत्मामा चौकाजवळ शूट केल्याने आता ती प्रचंड ट्रोल होत आहे.तिच्या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेच, परंतु तिने व्हिडीओ शूटसाठी निवडलेलं ठिकाण अनेकांना खटकलं आहे. यामुळे अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलंय.

गौरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटसह फेसबुकवर देखील हा व्हिडीओ पोस्ट केल्याचा पाहायला मिळतोय.  मुंबईतील हुत्मात्मा स्मारकाजवळ तिने हा व्हिडीओ शूट केल्याने अभिनेत्री टिकेची धनी ठरली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौताम्य पत्करलेल्या हुताम्यांचे स्मरण राहावे, या उद्देशाने स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र,या स्मारकाजवळ व्हिडीओ काढल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे." मागे तो पुतळा कशाचं प्रतिक आहे, याचं भान ठेवा...", तसेच आणखी एका यूजरने म्हटलंय, "जरा मागे काय आहे हे बघून तरी रिल बनवायची...", अशा कमे्ंटस करत नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला खडेबोल सुनावले आहेत. 

Web Title : मुंबई के हुतात्मा चौक के पास वीडियो बनाने पर मराठी अभिनेत्री ट्रोल।

Web Summary : मराठी अभिनेत्री गौरी नलावडे को हुतात्मा चौक के पास वीडियो बनाने पर आलोचना का सामना करना पड़ा। नेटिज़न्स ने स्मारक के महत्व के प्रति उनकी असंवेदनशीलता की आलोचना की, और उनके कार्यों को शहीदों के लिए अपमानजनक माना।

Web Title : Marathi actress trolled for video shoot near Mumbai's Hutatma Chowk.

Web Summary : Marathi actress Gauri Nalawade faces backlash for filming a video near Hutatma Chowk. Netizens criticized her insensitivity towards the memorial's significance, deeming her actions disrespectful to martyrs.