जे भल्याभल्यांना जमत नाही ते करून दाखवलं! घोड्यावर स्वार होऊन मराठी अभिनेत्री सुसाट, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 15:28 IST2025-05-04T15:27:44+5:302025-05-04T15:28:06+5:30

अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती अभिनेत्री घोड्यावर बसून Horse Riding करत असल्याचं दिसत आहे.

marathi actress gauri ingawale horse riding video viral | जे भल्याभल्यांना जमत नाही ते करून दाखवलं! घोड्यावर स्वार होऊन मराठी अभिनेत्री सुसाट, व्हिडिओ होतोय व्हायरल

जे भल्याभल्यांना जमत नाही ते करून दाखवलं! घोड्यावर स्वार होऊन मराठी अभिनेत्री सुसाट, व्हिडिओ होतोय व्हायरल

सेलिब्रिटींना त्यांच्या चित्रपटातील भूमिकेनुसार अनेकदा वेगवेगळं प्रशिक्षण घ्यावं लागतं. तलवारबाजी, घोडेस्वारी, मर्दानी खेळ किंवा इतर अनेक गोष्टी कलाकार त्यांच्या भूमिकेसाठी शिकत असतात. ऐतिहासिक सिनेमात काम करताना काही सेलिब्रिटींना घोडेस्वारी शिकावी लागते. पण, हे इतकं सहज सोपं नसतं. जे भल्याभल्यांना जमत नाही ते एका मराठी अभिनेत्रीने करून दाखवलं आहे. 

अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती अभिनेत्री घोड्यावर बसून Horse Riding करत असल्याचं दिसत आहे. घोड्यावर बसून अभिनेत्री सुसाट जात असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. व्हिडिओत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे मराठी अभिनेत्री गौरी इंगावले आहे. 


गौरीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. काकस्पर्श, पांघरुण, दे धक्का २, ही अनोखी गाठ, कुटुंब अशा सिनेमांमध्ये ती झळकली आहे. गौरी ही महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची मानलेली मुलगी आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट्स देत असते. 

Web Title: marathi actress gauri ingawale horse riding video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.