तू आपला माणूस आहेस म्हणून सांगतो...! दीपाली सैय्यद यांचा भन्नाट व्हिडीओ एकदा पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 10:29 IST2022-03-17T10:28:39+5:302022-03-17T10:29:15+5:30

Deepali sayed : गेल्या काही वर्षांत दीपाली यांनी स्वत:ला समाजसेवेत झोकून दिलं आहे. याच दीपाली यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. 

marathi actress Deepali bhosale sayed reel viral on social media | तू आपला माणूस आहेस म्हणून सांगतो...! दीपाली सैय्यद यांचा भन्नाट व्हिडीओ एकदा पाहाच!!

तू आपला माणूस आहेस म्हणून सांगतो...! दीपाली सैय्यद यांचा भन्नाट व्हिडीओ एकदा पाहाच!!

अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali sayed ) यांचा आज अख्खा महाराष्ट्र ओळखतो. त्यांचे सिनेमे, त्यांचा डान्स सगळंच सदाबहार. गेल्या काही वर्षांत दीपाली यांनी स्वत:ला समाजसेवेत झोकून दिलं आहे. याच दीपाली यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. 

होय, सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या दीपाली यांनी एक भन्नाट रील शेअर केला आहे. ‘तू आपला माणूस आहेस म्हणून सांगतो...रात्री आजिबात उन्हं लागतं नाही....,’ असं व्हिडीओच्या सुरूवातीला त्या आपल्या अंदाजात म्हणतात आणि मग बॅकग्राऊंडमध्ये ‘धीरे धीरे बोल कोई सुन ना ले...,’ हे गाणं वाजायला लागतं.

दीपाली या गाण्यावर एन्जॉय करताना दिसतात. गाडीतून प्रवास करत असतानाचा त्यांना हा भन्नाट व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या भन्नाट व्हिडीओवर चाहत्यांनी तेवढ्याच भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. खूपच गोड आपला माणूस, अशी कमेंट एका युजरने केली आहे. कडक, एक नंबर, अशा प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिल्या आहेत.

दीपाली सैय्यद यांना खरी लोकप्रियता मिळाली ती ‘जत्रा’ चित्रपटातील ‘ये गो ये मैना’ या गाण्याने. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले.  बंदिनी, समांतर या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. यानंतर त्या चित्रपटांत झळकल्या. जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात,  करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात त्यांनी अभिनयाचा ठसा उमठविला आहे.

 दीपाली यांनी गेल्या काही वर्षांत राजकारण आणि समाजकारणात सक्रीय आहेत. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचे कार्य त्या करत असतात. पुरगस्तांची मदत असो किंवा मग मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणं असो असे अनेक कार्यांत दिपाली यांनी लोकांची मदत केली आहे.

Web Title: marathi actress Deepali bhosale sayed reel viral on social media