लग्नानंतर काही वर्षातच घटस्फोट; भार्गवी म्हणाली, "आता मागे वळून पाहिल्यावर वाटतं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 10:38 IST2023-10-25T10:38:08+5:302023-10-25T10:38:38+5:30

भार्गवी चिरमुले अनेक वर्षांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करत आहे.

marathi actress Bhargavi Chirmule talks about her divorce and single life | लग्नानंतर काही वर्षातच घटस्फोट; भार्गवी म्हणाली, "आता मागे वळून पाहिल्यावर वाटतं..."

लग्नानंतर काही वर्षातच घटस्फोट; भार्गवी म्हणाली, "आता मागे वळून पाहिल्यावर वाटतं..."

मनोरंजनसृष्टीत लग्न, घटस्फोट हे होतच असतात. अनेक सेलिब्रिटी असे आहेत जे वेगळे राहत आहेत तर काहींनी घटस्फोट घेतला आहे. अनेकांनी पुन्हा लग्नही केलं तर काही मात्र एकटेच राहत आहेत.  त्यापैकीच एक भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule). लग्नानंतर काहीच वर्षात भार्गवी चिरमुलेचा घटस्फोट झाला. यानंतरच्या आयुष्याबद्दल तिने नुकतंच एका मुलाखतीत भावना व्यक्त केल्या. 

भार्गवी चिरमुले अनेक वर्षांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करत आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती उत्तम डान्सरही आहे. शिवाय ती योगही शिकवते. नुकतंच 'मीडिया टॉक'ला दिलेल्या मुलाखतीत भार्गवीला तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांविषयी विचारण्यात आलं. तेव्ही ती म्हणाली,'बाबांचं जाणं आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी अवघड होत्या. मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा बाबा अचानक गेले मला दुसऱ्या दिवशी शूटला उभं राहावं लागलं होतं.'

ती पुढे म्हणाली, "तसंच जेव्हा माझा घटस्फोट झाला तो काळ मी मागे वळून बघितल्यावर मला वाटतं ठिके यार मी सिंगल आहे म्हणून काय झालं. मी खूश आहे माझ्या आजूबाजूचे खूश आहेत. मी कोणालाही त्रास दिलेला नाही. झालं ते झालं माझ्या आयुष्यात. मी आता पुढे गेले आहे. मी हवं ते हवं तसं काम करत आहे. मला उलट वाटतं की प्रत्येकाला तसा आनंद मिळत नाही. मी स्ट्राँग आहे. मागे वळून पाहताना वाटतं की इतका मोठा समुद्र पार केलाय तर आता कशाचीच भीती वाटत नाही."

भार्गवीने 'वहिनीसाहेब','आई मायेचा कवच'  या मालिकांमध्ये काम केले आहे. तर 'वन रुम किचन','संदुक' यासारख्या काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. भार्गवीचं स्वत:चं युट्यूब चॅनलही आहे.

Web Title: marathi actress Bhargavi Chirmule talks about her divorce and single life