Amruta Subhash : -म्हणून आम्हाला बाळ नकोय..., अमृता सुभाषने पहिल्यांदाच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 10:53 AM2022-11-20T10:53:44+5:302022-11-20T10:54:23+5:30

Marathi Actress Amruta Subhash : आम्हाला मुलं आवडत नाहीत असं नाही; पण.... काय म्हणाली अमृता...?

marathi actress Amruta Subhash on being mother, commented for the first time | Amruta Subhash : -म्हणून आम्हाला बाळ नकोय..., अमृता सुभाषने पहिल्यांदाच केला खुलासा

Amruta Subhash : -म्हणून आम्हाला बाळ नकोय..., अमृता सुभाषने पहिल्यांदाच केला खुलासा

googlenewsNext

अमृता सुभाष ( Amruta Subhash) ही एक गुणी अभिनेत्री. तिची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. याच अमृतानं काही दिवसांपूर्वी प्रेग्नंसी किटचा फोटो शेअर करत, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या पोस्टनंतर अमृता प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली होती. अमृता प्रेग्नंट आहे म्हटल्यावर सगळ्यांनीच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. अर्थात असं काही नव्हतं. ही एक प्रमोशनल पोस्ट होती. ती पोस्ट ‘वंडर वुमन’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अमृताने स्पष्ट केलं होतं. ‘वंडर वुमन’ याच चित्रपटाच्या निमित्ताने आता अमृताने आई न होण्याच्या निर्णयावर मोठा खुलासा केला आहे.

होय, ‘आपलं महानगर’ला दिलेल्या मुलाखतीत अमृता यावर बोलली. मी आणि माझा पती संदेश कुलकर्णी आम्ही दोघांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला असल्याचं तिने सांगितलं. या निर्णयामागचं कारणही तिने स्पष्ट केलं.


 
काय म्हणाली अमृता...

आता काळ बदलतो आहे. अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मुलं आवडतात पण त्यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हीही अशाच जोडप्यांपैकी एक आहोत. आमच्या मते, मुलं आवडणं आणि ती वाढवणं या दोन वेग वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही दोघंही आमच्या आमच्या करिअरमध्ये प्रचंड व्यग्र आहोत. साहजिकच आम्ही बाळाला वेळ देऊ शकू का? आणि त्याला न्याय देऊ शकू का? असा विचार आमच्या मनात आला आणि मग आम्ही आम्हाला बाळ नको, असा निर्णय घेतला.  आमच्या कामावर आमचं खूप प्रेम आहे आणि ते आम्ही सोडू शकत नाही. मात्र कामावरच्या प्रेमापोटी बाळाकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. आमच्यासारखा विचार करणारे असे अनेकजण आहेत.

आम्हाला मुलं आवडत नाहीत असं नाही. आमच्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांवर मी खूप प्रेम करते. मी माझी काम करून मला वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी खेळायला जाऊ शकते. मी करिअरकडे ज्या पद्धतीने पाहते त्यात बाळाचं संगोपन मला करता आलं असतं का? असा प्रश्न मला पडतो. बाळ आवडणं आणि त्याला जन्म देऊन त्याचं चांगलं संगोपन करणं यासाठी खूप एनर्जी लागते. ही एनर्जी आमच्यासारख्यांना इतर गोष्टींमध्ये वापराविशी वाटते. आता अनेकजण बदलत्या काळानुसार हा विचार करू लागले आहेत. काळानुसार पूर्णत्त्वाची व्याख्याही बदलली आहे.  एक बाई तिच्या कामामुळे पूर्ण असू शकते किंवा तिच्या असण्याने ती पूर्ण असू शकते, असं अमृता म्हणाली.

अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे.  हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांच्या नाटकात काम तिने काम केलं. तिचं ‘ती फुलराणी’ हे नाटक तुफान गाजलं. 2004 साली तिने ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका सुद्धा आहे.  अमृता सुभाष ही उत्तम लेखिका असून तिचं 2014 साली ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.

Web Title: marathi actress Amruta Subhash on being mother, commented for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.