Photos: गोकुळासारखं आहे अलका कुबल यांचं कुटुंब; पाहा कोणकोण आहे त्यांच्या फॅमिलीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:37 IST2023-04-25T18:35:48+5:302023-04-25T18:37:42+5:30

Alka kubal: अलका कुबल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर त्यांचं कुटुंब किती मोठं आहे याचा अंदाज लावता येतो.

marathi actress alka kubal family photo | Photos: गोकुळासारखं आहे अलका कुबल यांचं कुटुंब; पाहा कोणकोण आहे त्यांच्या फॅमिलीत

Photos: गोकुळासारखं आहे अलका कुबल यांचं कुटुंब; पाहा कोणकोण आहे त्यांच्या फॅमिलीत

'माहेरची साडी' या गाजलेल्या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (Alka kubal). आजवरच्या कारकिर्दीत अलका यांनी 'लेक चालली सासरला', 'वहिनीची माया', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' अशा असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच कायम चर्चा रंगत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या कुटुंबियांची चर्चा रंगली आहे. अलिकडेच त्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे.

अलका कुबल (alka kubal) यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर त्यांचं कुटुंब किती मोठं आहे याचा अंदाज लावता येतो. यात त्यांच्या पती, मुलींशिवाय घरातील अन्य सदस्यही दिसून येत आहे.

दरम्यान, अलिकडेच अलका कुबल यांच्या लेकीचं इशानीचं लग्न पार पडलं. दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत इशानीने लग्न केलं आहे. अलका कुबल यांनी मोठा पडदा गाजवल्या नंतर आता त्यांचा मोर्चा त्यांनी छोट्या पडद्याकडे वळवला आहे.  अलिकडेच त्या 'आई माझी काळुबाई' या मालिकेत झळकल्या होत्या.
 

Web Title: marathi actress alka kubal family photo