हा मराठी अभिनेता लवकरच बनणार बाबा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 17:19 IST2018-05-28T11:41:16+5:302018-05-28T17:19:04+5:30
एक सात नमस्ते, आपण यांना पाहिलंत का?, लगे रहो राजाभाई, एक दोन तीन चार, तीन जीव सदाशिव, वाऱ्यावरची वरात, ...

हा मराठी अभिनेता लवकरच बनणार बाबा...
ए सात नमस्ते, आपण यांना पाहिलंत का?, लगे रहो राजाभाई, एक दोन तीन चार, तीन जीव सदाशिव, वाऱ्यावरची वरात, वासूची सासू यांसह अनेक नाटकांमध्ये प्रणव रावराणेने काम केले आहे. दुनियादारी या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात त्याने साकारलेली सॉरीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. प्रणव रावराणे याची मराठी जगतात उत्तम कॉमेडी कलाकार म्हणून ख्याती आहे. त्याने अनेक स्टेज शोही केलेत. प्रणवचा मस्का हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मस्का या चित्रपटात प्रणवने एक खूप चांगली भूमिका साकारली असून ती प्रेक्षकांना आवडेल अशी त्याला खात्री आहे. प्रणव त्याच्या व्यवसायिक आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यात सध्या चांगलाच खूश आहे. प्रणव खूश असण्यामागे एक खास कारण आहे. प्रणवच्या घरात लवकरच एका छोट्याशा बाळाचे आगमन होणार आहे. प्रणवनेच ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना दिली आहे.
प्रणवचे डिसेंबर २०१७ मध्ये अमृता सकपाळसोबत लग्न झाले होते. अमृता ही देखील एक अभिनेत्री असून तिने माझे मन तुझे झाले या मालिकेत काम केले होते. तसेच ऑल द बेस्ट नाटकात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आता प्रणव आणि अमृता यांच्या घरात एका चिमुकल्या बाळाचे आगमन होणार आहे. प्रणवने फेसबुक या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सगळ्यांना ही बातमी सांगितली आहे. अमृताने नुकतेच मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. प्रणवने फोटोशूटमधील काही निवडक फोटोज आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. या फोटोंसोबत प्रणवने खूप छानशी कॅप्शन देखील लिहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, सांगण्यास आनंद होत आहे की... लवकर आमच्याकडे बाल कलाकार येणार आहे... प्रणवने शेअर केलेल्या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी खूप सारे लाइक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.
![pranav raorane wife]()
Also Read : दुनियादारीतील सॉरीने कोणाशी केले लग्न