"रोज एक तरी माणूस माझे पाय धरून म्हणतो तुम्हीच कृष्ण...", स्वप्नील जोशीचं वक्तव्य चर्चेत
By कोमल खांबे | Updated: March 28, 2025 11:35 IST2025-03-28T11:31:58+5:302025-03-28T11:35:08+5:30
स्वप्निल जोशीने साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याचाच एक किस्सा अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

"रोज एक तरी माणूस माझे पाय धरून म्हणतो तुम्हीच कृष्ण...", स्वप्नील जोशीचं वक्तव्य चर्चेत
स्वप्निल जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. स्वप्नीलने बालकलाकार म्हणूनच काम करायला सुरुवात केली होती. रामानंद सागर यांच्या 'कृष्णा' या मालिकेने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. या मालिकेत त्याने साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याचाच एक किस्सा अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
स्वप्निलने नुकतीच 'न्यूज १८ लोकमत' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला "तुमचा कृष्ण आवडतो असा कोणी प्रेक्षक भेटलाय का?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना स्वप्निल म्हणाला, "मला रोज कोणीतरी भेटतच. रोज एक तरी माणूस माझे पाय धरून म्हणतो की कृष्ण तुम्हीच आहात. मला असं वाटतं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे राहणार आहे. मला सार्थ अभिमान आहे की ते आहे. तो माझ्या असण्याचा अस्तित्त्वाचा एक भाग आहे. हल्ली न्यूडल्स पण २ मिनिटांत येतात. हा आपला रिकॉल आहे. इथे जर ३०-४० वर्षांपूर्वी केलेलं काम काल केल्यासारखं आठवतंय तर तो आशीर्वाद आहे, असं मला वाटतं".
दरम्यान, स्वप्निल आता सुशीला-सुजीत सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीदेखील मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमात सुनिल तावडे, रेणुका दफ्तरदार, प्रसाद ओक, सुनिल गोडबोले यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.