स्वप्नील जोशीच्या 'प्रेयसी'ला पाहिलीत का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 14:40 IST2023-10-30T14:40:00+5:302023-10-30T14:40:00+5:30
Swapnil Joshi: स्वप्नील जोशीची ही प्रेयसी नेमकी कोण आहे? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

स्वप्नील जोशीच्या 'प्रेयसी'ला पाहिलीत का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. उत्तम अभिनय आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर स्वप्नीलने कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारा स्वप्नील कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. यात अलिकडेच त्याने एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या प्रेयसीविषयी भाष्य केलं आहे.
स्वप्नील सोशल मीडियावर सक्रीय असल्यामुळे कायम त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयी काही ना काही अपडेट चाहत्यांना देत असतो. यात त्याने नुकताच त्याच्या लेकीसोबत एक छानसा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये प्रेयसी असं म्हटलं आहे. त्यामुळे त्याच्या व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
दरम्यान, स्वप्नीलने या व्हिडीओमध्ये त्याच्या लेकीसोबतचे काही क्यूट क्षण कैद केले आहेत. स्वप्नीलच्या लेकीचं नाव मायरा असं असून तो कायम त्याच्या मुलांसोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.