मराठी सिनेइंडस्ट्रीतील हा अभिनेता अडकला लग्नबेडीत, पहा लग्न सोहळ्यातील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 11:22 IST2020-01-31T11:21:50+5:302020-01-31T11:22:13+5:30
या अभिनेत्याने करियरची सुरूवात रेडिओ जॉकी म्हणून केली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील हा अभिनेता अडकला लग्नबेडीत, पहा लग्न सोहळ्यातील फोटो
मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता सुहृद वार्डेकर नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. त्याचे लग्न कुठे पार पडले हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र त्याचे डेस्टिनेशन वेडिंग झालं असून हळदी व लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
सुहृद वार्डेकर नुकताच पुण्याच्या प्राची खडतकरसोबत लग्नबेडीत अडकला आहे. हा लग्न सोहळा अमरावती येथे मोठ्या थाटात पार पडला. त्याच्या लग्नाचे हे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले असून या सोहळ्यात अभिनेता संग्राम समेळसह अनेक सहकलाकारांनी हजेरी लावली होती.
सुहृद वार्डेकर मूळचा नागपूरचा असून सुरुवातीला एक रेडिओ जॉकी आणि साउंड इंजिनिअर म्हणून त्याने रेडिओ सिटी मध्ये काम पाहिले होते.
तसेच २०१८ साली त्याचा गोव्याचे किनाऱ्यावर हा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री सिद्धी पाटणे होती. या अल्बमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
त्यानंतर सुहृद व सिद्धी स्टार प्रवाहवरील ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेत झळकले होते. ‘भास तुझा’ या आणखी एका म्युजिक व्हिडिओतून हे दोघेही एकत्रित झळकले.
आता सुहृद लवकरच मल्हार गणेश दिग्दर्शित ‘दाह’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.