सिद्धार्थला युजरने दिली आईवरुन शिवी; अभिनेत्याने केला किमान शब्दात कमाल अपमान, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 12:06 IST2023-05-29T12:05:13+5:302023-05-29T12:06:43+5:30

Siddharth jadhav: एका युजरने त्याला आईवरुन शिवी देत ट्रोल केलं आहे. या ट्रोलरचा त्याने कमी शब्दांत चांगला अपमान केला आहे.

marathi actor siddharth jadhav angry some netizens using bad words comment | सिद्धार्थला युजरने दिली आईवरुन शिवी; अभिनेत्याने केला किमान शब्दात कमाल अपमान, म्हणाला...

सिद्धार्थला युजरने दिली आईवरुन शिवी; अभिनेत्याने केला किमान शब्दात कमाल अपमान, म्हणाला...

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). हटके स्टाइल आणि उत्तम अभिनय यामुळे चर्चेत येणारा सिद्धार्थ सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टीव्ह आहे. मराठीतला रणवीर सिंग म्हणून ओळखला जाणारा सिद्धार्थ कायम त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्यामुळे नेटकरी कायम त्याचं कौतुक करतात. मात्र, यावेळी एका युजरने त्याला आईवरुन शिवी देत ट्रोल केलं आहे. या ट्रोलरचा त्याने कमी शब्दांत चांगला अपमान केला आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये एका युजरने त्याला शिवी दिली असून या युजरला त्याने थेट प्रश्न विचारला आहे.

सिनेमागृहाबाहेर वडिलांनी पेपरवर झोपून काढले दिवस; त्यासमोरच्या टॉवरमध्ये घेतलं सिद्धार्थने घर

काय आहे सिद्धार्थची पोस्ट?

“अरे बावळट बोर्डच्या सिद्ध कितीवर एक्टिंग करशील मा**** काल्या”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. त्यावर सिद्धार्थने उत्तर दिलं आहे. “ट्रोलिंग मान्य आहे, पण शिवी देणं कितपत योग्य आहे? फक्त विचारतोय”, असा प्रश्न सिद्धार्थने या ट्रोलरला विचारला आहे. 

दरम्यान,  सिद्धार्थला कायम त्याच्या लूकवरुन, दिसण्यावरुन ट्रोल केलं जातं. मात्र, तो कायम ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतो. परंतु, यावेळी आईवरुन शिवी दिल्यामुळे तो संतापला आणि त्याने प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या सिद्धार्थ त्याच्या लेकींसोबत लंडन टूरवर असून येतील अनेक पोस्ट त्याने केल्या आहेत.
 

Web Title: marathi actor siddharth jadhav angry some netizens using bad words comment