पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

By देवेंद्र जाधव | Updated: June 15, 2025 12:59 IST2025-06-15T12:57:02+5:302025-06-15T12:59:26+5:30

फादर्स डे निमित्त मराठी अभिनेत्याने त्याच्या आई-बाबांसाठी खास गोष्ट केली आहे. त्यामुळे अभिनेत्याचे चाहते आणि सेलिब्रिटींनी त्याचं कौतुक केलं आहे

Marathi actor shubhankar tawde bought a new house for his parents sunil tawde | पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

प्रत्येकाचे आई-बाबा मुलांसाठी अहोरात्र झटत असतात. मुलांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून पालक त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आई-वडिलांच्या याच कष्टाची जाण मनात ठेऊन मराठी अभिनेत्याने त्याच्या बहिणीसोबत मिळून आई-बाबांसाठी नवीन  घर घेतलं आहे. हा अभिनेता म्हणजे शुभंकर तावडे. लोकप्रिय अभिनेता शुभंकरने त्याची बहीण अंकितासोबत वडील सुनील तावडे आणि आईसाठी नवीन घर घेतलं आहे. शुभंकर-अंकिताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.

शुभंकरने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर

शुभंकरच्या बहिणीने सोशल मीडियावर नवीन घरात गृहप्रवेश करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत अभिनेते सुनील तावडे आणि त्यांच्या पत्नीच्या गळात हार दिसत असून सर्वांनी फोटोसाठी पोज दिली आहे. हे फोटो पोस्ट करुन त्याखाली अंकिताने कॅप्शन दिलंय की,  "तावडे निवाससाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात..  आम्ही अत्यंत आनंदाने शुभू आणि मी तुम्हा सर्वांसोबत एक खास गोष्ट शेअर करण्यास उत्सुक आहोत - आम्ही आमच्या आई-बाबांसाठी एक घर खरेदी केले आहे!'


"हा फक्त एक नवीन पत्ता नाही, हे आमच्या पालकांनी आमच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठीची एक कृतज्ञता आहे. प्रेम, सांत्वन आणि आशीर्वादांनी भरलेले एक ठिकाण जिथे तावडे निवासाची आणखी भरभराट होत राहील. अगदी मनापासून आम्ही आमच्या नवीन घरात असंख्य सुंदर आठवणी निर्माण करण्यास उत्सुक आहोत." शुभंकर-अंकिताने हे फोटो शेअर करताच अनेक कलाकारांनी त्यांचं अभिनंदन करुन त्यांनी आई-बाबांसाठी केलेल्या कृतीचं कौतुक केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे हे गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. 'फू बाई फू', 'कॉमेडी एक्सप्रेस'सारखे शो त्यांनी गाजवले आहेत. याशिवाय सुुनील तावडेंचा मुलगा शुभंकर हा सुद्धा मराठी मनोरंजन विश्वात विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना दिसतोय. शुभंकरने रितेश देशमुखसह 'वेड' या सिनेमात अभिनय केला होता. शुभंकरची बहीण अंकिताची सुद्धा सोशल मीडियावर चर्चा असते. अशाप्रकारे फादर्स डे निमित्त शुभंकर  - अंकिताने ही गुड न्यूज सर्वांना दिली आहे.

Web Title: Marathi actor shubhankar tawde bought a new house for his parents sunil tawde